लालपरी सज्ज, अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार, ‘या’ अटींसह प्रवास शक्य

नियम आणि अटींसह एसटी महामंडळ या सर्व लोकांना इच्छित स्थळी मोफत पोहोचवणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली.

लालपरी सज्ज, अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार, 'या' अटींसह प्रवास शक्य
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 4:42 PM

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेले नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि मजुरांसाठी लालपरी अर्थात एसटी मदतीला (Free ST Bus Service) धावली आहे. नियम आणि अटींसह एसटी महामंडळ या सर्व लोकांना इच्छित स्थळी मोफत पोहोचवणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून (Free ST Bus Service) करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी सर्व ठिकाणच्या प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदीमुळे राज्यात अडकलेले नागरिक आपापल्या जिल्हयात जाऊ शकतील. यासाठी मोफत एसटी बस सेवा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या प्रवासासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.

काय आहेत एसटी प्रवासाचे नियम?

  • एका एसटी बसमध्ये एकावेळी 22 जणांचा ग्रुप प्रवास करु शकेल
  • या 22 जणांच्या ग्रुप लीडरला पोलीस स्टेशन आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी किंवा तहसीलदाराला प्रवासाच्या परवागनीसाठी अर्ज करावा लागेल.
  • प्रवाशांना आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र दाखवत स्वतःची ओळख द्यावी लागेल
  • प्रवासादरम्यान प्रवाशाला मास्क लावणे अनिवार्य असेल
  • एसटी बसमध्ये एका एका सीटवर एकच प्रवासी बसेल (Free ST Bus Service)
  • पॉईंट टू पॉईंट सर्व्हिस असेल, एसटी रस्त्यात इतर कुठेही थांबणार नाही
  • लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवासांनी स्वतःचे अन्न सोबत घ्यावे
  • एसटी बस वाटेत ढाबा किंवा हॉटेलवर थांबणार नाही
  • प्रवाशांनी फक्त एसटी डेपो आगारातील स्वछता गृहाचा वापर करावा
  • कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना प्रवासाची परवागनी नाही

VIDEO :

संबंधित बातम्या :

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

630 किमीचा प्रवास, 70 बसवर 140 चालक, कोटाहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्याहून एसटी रवाना

विद्यार्थी, मजूर ते नातेवाईकांकडे अडकलेले पाहुणे, जिल्ह्यात परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.