AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Power cut: मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला; तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत

महापरेषणच्या 400KV कळवा पडघा GSI केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती.

Mumbai Power cut: मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला; तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत
| Updated on: Oct 12, 2020 | 11:54 AM
Share

मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात ठप्प असलेला वीजपुरवठा आणखी तासाभरात पूर्ववत होईल, असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. मुंबईसह इतर भागातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्याने सध्या गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना वीजपुरवठा तासाभरात पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तांत्रिक बिघाड का झाला, याची चौकशी करणार असल्याचेही नितीन राऊत यांनी सांगितले. (Power cut in Mumbai)

महापरेषणच्या 400KV कळवा पडघा GSI केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील वीज गेल्याचेही नितीन राऊत यांनी सांगितले. यानंतर सर्किट 2च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले.

सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली आहे. मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झालं. त्या सरकारी आणि खासगी कार्यालयातील काम ठप्प झालं. तर इंटरनेट ठप्प झाल्यामुळे मोबाईलमधून मेसेजही जात नव्हते. सोशल मीडियाही अचानक ठप्प झाल्याने मुंबईकर थोडावेळ गोंधळून गेले होते. दुसरीकडे वीज गेल्याने कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाबाहेर आले होते.

कोणकोणत्या भागात वीज गायब?

दादर लालबाग परळ प्रभादेवी वडाळा ठाणे नवी मुंबई पनवेल बोरिवली मालाड कांदिवली पेण पनवेल उरण कर्जत खालापूर

संबंंधित बातम्या:

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

mumbai power cut ! मुंबई-ठाण्याला विजेचा झटका, रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

(Power cut in Mumbai)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.