आता महाराष्ट्राचा नंबर : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन महत्त्वाची राज्ये भाजप गमावण्याची शक्यता आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, …

आता महाराष्ट्राचा नंबर : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन महत्त्वाची राज्ये भाजप गमावण्याची शक्यता आहे.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, “राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सर्व ट्रेंड बदलला होता. त्यांनी अनेक मुद्दे लावून धरले. सर्व काँग्रेस नेते एकत्र येऊन हे यश मिळवलं आहे. देशात कोणी कोणत्या पक्षाला संपवू शकत नाही”.

याशिवाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही आम्ही सर्व काँग्रेस नेते जोमाने काम करु. राज्यात आता राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत येतील हे नक्की आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

पाच राज्यांचा निकाल

पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने आगेकूच केली आहे. पाचपैकी तीन राज्यात काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर छत्तीसगडमध्ये 90 पैकी तब्बल 60 जागांवर आघाडी घेतली आहे. तिकडे मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपात काँटे की टक्कर आहे. मिझोराममध्ये स्थानिक एमएनएफ आघाडीवर आहे तर तेलंगणात टीआरएसने बहुमताचा आकडा पार केला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण सत्ता मिळवतं, याचा निर्णय आज जाहीर होत आहे.

संबंधित बातम्या 

मिझोरामचे मुख्यमंत्री 2 ठिकाणी उभे राहिले, दोन्ही ठिकाणी पडले  

मुंबई भाजप कार्यालयात झेंडे लावून कार्यकर्ते पसार   

तेलंगणात ओवेसींच्या भावाचा निकाल लागला!   

वाजपेयींच्या पुतणीने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची धाकधूक वाढवली! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *