राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा मोर्चा, नेमका मार्ग कसा?

मनसेच्या मोर्चासाठी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे.

Raj Thackeray MNS Morcha Route, राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा मोर्चा, नेमका मार्ग कसा?

मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या (रविवार 9 फेब्रुवारी) मोर्चा निघणार आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार (Raj Thackeray MNS Morcha Route) आहेत. या मोर्चाचा नेमका मार्ग कोणता असेल,

राज्यभरातील मनसैनिक मुंबईतील मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. मनसेने मोर्चासाठी आधी भायखळ्यातील राणीचा बाग ते आझाद मैदान या मार्गावर परवानगीची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी ती नाकारत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गासाठी संमती दिली आहे.

कसा असेल मनसेच्या मोर्चाचा मार्ग?

दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील.

शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.

पुण्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, ‘राजगर्जना बाईक रॅली’पूर्वी कारवाई

आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल. (Raj Thackeray MNS Morcha Route)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *