AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम केअरचा पैसा बाहेर काढा, सेंट्रल विस्टाचं काम थांबवा; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुल पत्रं

देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने देशातील 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्रं लिहिलं आहे. (12 opposition leaders write to PM Modi on corona crisis)

पीएम केअरचा पैसा बाहेर काढा, सेंट्रल विस्टाचं काम थांबवा; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुल पत्रं
| Updated on: May 12, 2021 | 8:23 PM
Share

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने देशातील 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून विरोधकांनी मोदींना कोरोनाच्या संकटामुळे सेंट्रल विस्टाचं काम थांबवण्यासह 9 सल्ले दिले आहेत. (12 opposition leaders write to PM Modi on corona crisis)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, जेडीएसचे नेते एचडी देवगौडा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, डीएमके नेते एमके स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, सीपीआय नेते डी. राजा आणि सीपीआयचे नेते सीताराम येचुरी आदींच्या या खुल्या पत्रावर सह्या आहेत. या पत्रात मोफत लसीकरण करणे, सेंट्रल विस्टा प्रकल्प बंद करणे आणि त्याचा पैसा आरोग्य व्यवस्थेवर लावणे तसेच बेरोजगारांना 6 हजार रुपये मासिक भत्ता देणे आदी मागणी केली आहे.

विरोधक पहिल्यांदाच एकवटले

विरोधकांनी कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच एकत्रित येऊन पंतप्रधा नरेंद्र मोदींना खुले पत्रं लिहिलं आहे. त्यामुळे मोदींची कोंडी होण्याची शक्यता आहे. आगामी काळात कोरोनाची स्थिती नियंत्रणात न आल्यास विरोधक अधिकच आक्रमक होण्याची चिन्हेही या निमित्ताने दिसत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

विरोधकांच्या नऊ मागण्या

>> जिथून शक्य होईल तिथून व्हॅक्सीन खरेदी करा, मग ती देशातून किंवा विदेशातून >> संपूर्ण देशात तात्काळ व्यापक लसीकरण सुरू करा >> देशांतर्गत लसीकरणासाठी आवश्यक लायसेंसिंग लागू करा >> व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटींचा बजेट ठेवा >> सेंट्रल विस्टा प्रोग्राम थांबवा. त्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद व्हॅक्सिन आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा >> पीएम केअर फंड आणि सर्व खासगी फंडासाठी फंडातील सर्व जमा रक्कम बाहेर काढा आणि त्यातून ऑक्सिजन तसेच मेडिकल उपकरणे खरेदी करा >> बेरोजगारांना 6 हजार रुपये दरमहा भत्ता द्या >> सर्व गरजूंना मोफत अन्नधान्य द्या >> महामारीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतीकामाकडे लक्ष देता यावे म्हणून कृषी कायदा मागे घ्या

24 तासातील आकडेवारी

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 48 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 205 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 197 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 4 हजार 99 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (12 opposition leaders write to PM Modi on corona crisis)

संबंधित बातम्या:

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, बळींचा आकडाही 4200 पार

हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा भारतात उगम, अफवा की सत्य ? केंद्र सरकारनं दिली खरी माहिती

लग्नानंतर काही तासातच नववधूचा मृत्यू, वरातीऐवजी अंत्ययात्रा, नवरदेवाकडून मुखाग्नी

(12 opposition leaders write to PM Modi on corona crisis)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.