AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप रे! दोन आठवड्यात 15 प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू; अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दहशत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. (15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

बाप रे! दोन आठवड्यात 15 प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू; अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दहशत
Aligarh Muslim University
| Updated on: May 09, 2021 | 10:32 AM
Share

लखनऊ: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दोन आठवड्यातच कोरोनामुळे 15 प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी मिळून विद्यापीठातील एकूण 40 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. (15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाशी संबंधित एका प्राध्यापकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एएमयू कायदा शाखेचे डीन प्रा. डॉ. मोहम्मद शकील अहमद समदानी यांचं एएमयूच्या जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना निधन झालं. दोन आठवड्यातच विद्यापीठातील 15 प्राध्यापकांचं निधन झालं आहे. प्राध्यापकांसह इतर कर्माचारी मिळून आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

विद्यापीठात दहशत

यूपीच्या जौनपूरचे राहणारे शकील समदानी यांनी यूपी बोर्डातून इयत्ता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर गोरखपूर विद्यापीठातून बीए केलं होतं. त्यानंतर त्यांनी अलिगढ विद्यापीठातूनही एलएलबी, एलएलएम आणि पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. रोज कोणत्या ना कोणत्या विद्यमान किंवा निवृत्त प्राध्यापकाच्या निधनावर विद्यापीठ प्रशासनाला शोक व्यक्त करावा लागत आहे. रोड कानावर पडणाऱ्या निधनाच्या वार्तेमुळे विद्यापीठात दहशत निर्माण झाली आहे.

कुलपतींचंही निधन

या महामारीत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलपती प्रा. तारीक मंसूर यांचंही निधन झालं आहे. विद्यापीठीतील संस्कृत विभागाचे माजी चेअरमन प्रा. खालिद बिन यूसूफ यांचंही काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झालं आहे. खालिद यांनी ऋग्वेदात पीएचडी केली होती. इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोमध्ये त्यांची कन्या इला आणि इब्रा यांनी भाग घेतला होता. पत्नीला व्हॉट्सअॅपवरून तलाक दिल्यामुळेही ते वादग्रस्त ठरले होते.

देशातील कोरोनाची आकडेवारी

आतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

संबंधित बातम्या:

तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढली, मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Maharashtra Coronavirus LIVE Update : पिंपरी चिंचवडमध्ये ‘रेमडेसिव्हीर’ काळ्या बाजारात विकताना तिघांना अटक

Corona Cases in India | एका दिवसात चार लाखाहून अधिक नवे कोरोनाग्रस्त, तब्बल 4092 कोरोनाबळी

(15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.