Assam Election 2026: ‘मुस्लिम पॉलिटिक्स’मुळे भाजपचा विजयाचा मार्ग सोप्पा! आसामध्ये काँग्रेसच्या 19 पैकी 18 आमदारांमध्ये हिंदू किती?
Assan Muslim MLA: आसाम राज्यात मुस्लिम बहुल पट्ट्यात काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी सत्तेचा सोपान चढण्यासाठी भाजपला काँग्रेसची हीच रणनीती उपयोगी ठरली आहे. काँग्रेसला एकांगी धोरणामुळे सत्तेचा सुकाणू हाती घेता आला नाही.

Assan Election 2026 : आसामच नाही तर इतरही राज्यात मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजप यशस्वी झाले आहे. पण काँग्रेसच्या धोरणांनी त्याला मोठा हातभार लावल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. आसाममध्ये मुस्लिम धार्जिण्या धोरणांमुळे काँग्रेसला मुस्लिम बहुल पट्ट्यात मोठा फायदा झाला. पण सत्ता खेचून आणता आली नाही. काँग्रेसवर धार्मिकतेचा कायमचा शिक्का बसला. सत्तेचा सोपान काही त्यांना गाठता आला नाही. उलट भाजपने त्यांच्या या रणनीतीचा आधार घेत सत्तेचा सुकाणू हाती घेतला आहे.
आसाममध्ये 19 पैकी 18 आमदार मुस्लिम
आसामध्ये काँग्रेसला एकूण 19 जागा मिळाल्या. त्यातील 18 जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी झाले. पक्षाने निवडणुकीच्या मैदानात एकूण 20 मुस्लिम उमेदवार उतरवले होते. त्यातील 18 जिंकले. तर 79 गैर मुस्लिमांपैकी केवळ एकच उमेदवार निवडून आला. काँग्रेसचा सहकारी रायजोर पक्षाला दोन जागा मिळाल्या. त्यातील एक मुस्लिम उमेदवार आणि दुसरी जागा अखिल गोगाई यांना मिळाली. त्यांच्यावर माओवादी संबंधित कारवाई सुरू आहे.
केरळममध्ये काँग्रेसचे मुस्लिम आमदार किती?
केरळम राज्यात 140 सदस्यांपैकी 35 मुस्लिम उमेदवार विजयी झाले. त्यातील 30 हे काँग्रेस नेतृत्वातील युडीएफचे मुस्लिम उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे 8 मुस्लिम आमदार आहेत. तर मित्र पक्ष इंडियन यूनियन मुस्लिम लिगचे सर्व 22 मुस्लिम आमदार आहेत. काँग्रेस आघाडीला मुस्लिम बहुल पट्ट्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन्ही जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने केवळ दोन जागा जिंकल्या. दोन्ही मुस्लिम उमेदवार विजयी झाले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने एकूण 63 मुस्लिम उमेदवार उतरवले होते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने 47 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा एक मुस्लिम आमदार
तामिळनाडू राज्यात काँग्रेसने दोन मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यातील एकाने विजय खेचून आणला. हा आकडा छोटा असला तरी थलपती विजयच्या झंझावात एक जागा आणणे ही मोठी गोष्ट मानली जाते. ही आकडेवारी पाहिली असता, काँग्रेसने मुस्लिम बहुल अथवा अल्पसंख्यांक पट्ट्यातील राजकारणावर भर दिल्याचे लक्षात येते. तर त्याचवेळी काँग्रेसच्या याखेळीचा फायदा भाजपने उचल्याचे दिसते. धार्मिक ध्रुवीकरणाचा एक मोठा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येत आहे.
