AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षणाला वय नसतं… डोंबिवलीच्या 53 वर्षीय महिलेने दिली 12 ची परीक्षा, मार्क जाणून व्हाल थक्क

शिक्षणाला वय नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. डोंबिवलीच्या छाया वाघमारे यांनी वयाच्या 53 व्या वर्षी 12 वी ची परीक्षा दिली आणि त्या प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाल्या. अशात छाया यांनी अन्य महिलांना देखील स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे...

| Updated on: May 05, 2026 | 2:02 PM
Share
शिक्षणाला वयाची कोणतेही मर्यादा नसते हे डोंबिवलीच्या छाया वाघमारे यांनी आपल्या कर्तव्युतातून सिद्ध केलंय.. वयाच्या 53 व्या वर्षी 12 वी च्या परीक्षेत 60.17 टक्के मिळवत उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्या आनंदी आहेत.

1 / 5
सांगायचं झालं तर,  घरच्या परिस्थितीमुळे आणि कमी वयात लग्न झाल्यामुळे छाया यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. मात्र वय वाढत असताना देखील काही जणांना शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. कारण आजच्या जगात स्वतःला टिकवायचं असेल तर, शिक्षण फार महत्त्वाचं आहे.

2 / 5
शिक्षणाचं महत्त्व छाया यांना देखील पटलं, म्हणून त्यांनी 2024 साली दहावीची परीक्षा देत उत्तीर्ण झाल्या तर यंदा बारावीची परीक्षेत 60.17 टक्के मिळवत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाल्या आहेत.. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे.

3 / 5
तसेच महाविद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच मला 12 वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता आले.. तसेच यापुढेही अजून शिकण्याची इच्छा छाया यांनी व्यक्त केली आहे. बाराची परीक्षा पास झाल्याने सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं.

4 / 5
छाया वाघमारे भावना व्यक्त करत म्हणाल्या, ज्या महिलांनी शिक्षण घेता येत नाही, त्या महिलांना मी एकच विनंती करते की, वेळ नसेल, किंवा  घरची परिस्थिती चांगली नसेल तर, नाईट स्कूल, नाईट कॉलेज सुरु करा आणि मनातील इच्छा आणि अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करा. नाईट स्कूल, नाईट कॉलेज मध्ये योग्या मार्गदर्शन आणि मोफत शिक्षण मिळतं. अशात शिक्षण घेतल्याचा तुम्हाला आनंद देखील होईल आणि पुढच्या जीवनासाठी शिक्षणाचा उपयोग देखील होईल.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी