Railway Rats : सौ चूहे खाकर.. एक उंदीर पकडण्यासाठी खर्च केले 41,000 हजार

Railway Rats : एका उंदराचे महाभारत तुम्हाला माहिती आहे का? तर रेल्वे अधिकाऱ्यांचा हा प्रताप जरुर वाचा. एक उंदीर पकडण्यासाठी 41,000 हजार रुपये खर्च केले, कुठे घडला हा खाबूगिरीचा प्रकार

Railway Rats : सौ चूहे खाकर.. एक उंदीर पकडण्यासाठी खर्च केले 41,000 हजार
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 9:37 AM

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : एका उंदाराचे महाभारत तुम्हाला माहिती आहे? हो, भारतीय रेल्वेच्या या विभागाने हा प्रताप करुन दाखवला. खाबूगिरीसाठी रेल्वेतील अधिकऱ्यांनी एक शक्कल लढवली. त्याच्या सुरस कथा आता बाहेर येत आहे. रेल्वेला उंदीरामुळे (Railway Rat) मोठे नुकसान होते, हे सर्वश्रुत आहे. मालगाड्यांना त्याचा अधिक फटका बसतो. प्लॅटफॉर्मवर सुद्धा उंदराचा सुळसुळाट असतो. त्यामुळे रेल्वे प्रत्येक वेळी उंदीर पकडण्यासाठी ना ना उपाय करते. उंदिरांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेले उपाय कमी पडत आहे. त्यासाठी त्यांनी हजार दोन हजार नाही तर लाखो रुपये खर्च केले आहे. पण तरीही रेल्वे अधिकाऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. उलट त्यांच्या वारेमाप खर्चातच अनेकांना खाबूगिरीचा वास येत आहे, काय आहे हे प्रकरण

कुठले आहे प्रकरण

उत्तर भारतीय रेल्वेतील लखनऊ विभागातील हे प्रकरण आहे. स्टेशनवर बिनधास्त फिरणाऱ्या उंदीरांना पकडण्यासाठी या विभागाने मोहीम राबवली. पण त्याचे खर्चाचे आकडे तुम्हाला हैराण करुन टाकतील. उंदीर पकडण्यासाठी एकूण 69 लाख रुपये खर्च करण्यात आले. इतका मोठा खर्च केल्यानंतर उंदीर गायब व्हायला हवे होते. या खर्चीक मोहिमेनंतर केवळ 168 उंदीर पकडण्यात आले. म्हणजे एका उंदीरावर जवळपास 41 हजार रुपये खर्च करण्यात आले. उंदीर पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचा खुलासा माहिती अधिकाराच्या एका अहवालात उघड झाला.

हे सुद्धा वाचा

तीन वर्षांत लाखोंची उधळपट्टी

आरटीआईच्या माहितीनुसार, लखनऊ विभागात गेल्या तीन वर्षांत खूप मोठी रक्कम खर्च करण्यात आली. पण तरीही उंदीरापासून काही सूटका झाली नाही. लखनऊ विभागात उंदीर पकडण्यासाठी 23.2 लाख रुपये खर्च केले आहे. हा आकडा बाहेर येताच एकच खळबळ उडाली आहे. हा सर्वच व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

कोणी मागितली होती माहिती

माहिती अधिकार कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी उंदीर पकडण्यासाठी रेल्वेने केलेल्या खर्चाचा तपशील मागितला होता. त्यासाठी त्यांनी आरटीआय अंतर्गत माहिती मागितली होती. त्यात हा प्रताप समोर आला. उत्तर रेल्वे विभागातील दिल्ली, अंबाला, लखनऊ, फिरोजपूर आणि मुरादाबाद या मंडळात हा प्रकार समोर आला.

पकडले 168 उंदीर

  1. उंदीर पकडण्यासाठी 69 लाख रुपये खर्च करण्यात आले
  2. या मोहिमेत आतापर्यंत केवळ 168 उंदीर पकडण्यात आले
  3. 2020 पासून उंदीर पकडण्याची मोहीम राबविण्यात आली
  4. पहिल्या वर्षी केवळ 83 उंदीर पकडले गेले
  5. 2021 मध्ये केवळ 45 उंदीर पकडण्याची कामगिरी बजावली गेली
  6. 2022 मध्ये रेल्वे विभागाने 40 उंदीर पकडण्याची मोहीम फत्ते केली
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....