काश्मीरमधील एका फोटोचा इंटरनेटवर धुमाकुळ, नजारा पाहून लोक हैराण!

काश्मीरमधील अशाच एका फोटोने सध्या इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. हा फोटो पाहून लोक हैराण होत आहेत. कारण, या फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला गाडी लावून काही लोक मूत्र-विसर्जन करत आहेत.

काश्मीरमधील एका फोटोचा इंटरनेटवर धुमाकुळ, नजारा पाहून लोक हैराण!

श्रीनगर : सोशल मीडियावर सातत्यानं एखाद्या नाविन्यपूर्ण किंवा विचित्र गोष्टीची चर्चा सुरु असते. काही फोटो, काही व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असतात. काही फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला पोट धरुन हसायला लावणारे असतात. तर काही फोटो किंवा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण होता. काश्मीरमधील अशाच एका फोटोने सध्या इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. हा फोटो पाहून लोक हैराण होत आहेत. कारण, या फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला गाडी लावून काही लोक मूत्र-विसर्जन करत आहेत.(A photo of some people urinating on the side of the road near Dal Lake in Kashmir went viral)

मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो जम्मू-काश्मीरचा आहे. डल तलावाकाठी अनेक टूरिस्ट रस्त्याच्या कडेला गाड्या लावून एकसोबत मूत्र-विसर्जन करत आहेत. त्याच रस्त्यावरुन अन्य गाड्याही जात आहेत. सोशल मीडियावर एका व्यक्तीने हा फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सुंदर काश्मीरमधील डल तलावाच्या किनाऱ्यावर भारतीय पर्यटक मूत्र-विसर्जन करत आहेत. लोकांचं हे वागणं कधी बदलेल? डल तलाव जगभरात प्रसिद्ध आहे’. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोक संतापही व्यक्त करत आहेत.

लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया

हा फोटो सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आतापर्यंत 2 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केलाय. तर पाचशेहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. ट्विटर यूजर्सकडून या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा भडीमारही सुरु आहे. यावर एका यूजरने लिहिलं आहे की, ‘असले प्रकार बंद झाले पाहिजेत’. तर एकाने म्हटलं आहे की, ‘कुणी समजून घेणार नाही’.

इतर बातम्या :

जम्मू-काश्मीर : नंदनवनमध्ये पर्जन्यवृष्टी, अनेक भागांत बर्फाची चादर

अमेरिकन पिझा कंपनीला भारतीय महिलेचा झटका, ‘या’ चुकीमुळे 1 कोटी नुकसान भरपाईची मागणी करत कोर्टात खेचलं

A photo of some people urinating on the side of the road near Dal Lake in Kashmir went viral

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI