आधारचे तपशील भरताना 'ही' चूक केल्यास मोठा दंड

आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅनच्या जागी आधार क्रमांक वापरण्याला परवानगी देण्यात आली आहे.

आधारचे तपशील भरताना 'ही' चूक केल्यास मोठा दंड

मुंबई : कर्जदारांच्या सोयीसाठी आयकर विभागाने पॅन नंबरच्या जागी 12 आकड्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करण्याची परवानगी दिली. मात्र, आधार क्रमांकाचा वापर करताना तुम्हाला अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, जर या दरम्यान तुम्ही चुकीचा आधार क्रमांक टाकला तर तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

वित्त विधेयक 2019 मधील आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅनच्या जागी आधार क्रमांक वापरण्याला परवानगी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर चुकीचा आधार क्रमांक दिल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

दंडाचा हा नवा नियम त्याच ठिकाणी लागू होईल जिथे तुम्ही पॅन क्रमांकाच्या जागी आधार क्रमांकाचा वापर करता. ज्या ठिकाणी पॅन कार्ड देणं आवश्यक असतं, जसे की इनकम टॅक्स रिटर्न, बँकेत खातं उघडणे, डीमॅट खातं उघडणे आणि 50 हजार रुपयांपेक्षा जास्त म्युचुअल फंड आणि बॉन्ड विकत घेणे, अशा परिस्थितीत तुम्ही पॅन कार्डच्या जागी आधार क्रमांक देऊ शकता.

आधारचे नवे नियम

आधार म्हणजेच युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलं जातं. मात्र, याबाबत दंडाची कारवाई ही आयकर विभागातर्फे केली जाते. आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 272बी नुसार, जर करदाता पॅनच्या नियमांचं पालन करण्यात अयशस्वी होतो तर त्यावर दंडाचती कारवाई होऊ शकते. कुठल्याही चुकीसाठी दंडाची रक्कम ही 10 हजार रुपये आहे. यापूर्वी दंड हा केवळ पॅन कार्डसाठी होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पॅन-आधारइंटरचेंजिबिलिटीची तरतूद करण्यात आली, त्यामुळे हे नियम आधारसाठीही लागू झाले.

दंडाचे नियम

  • पॅनच्या ऐवजी चुकीचा आधार क्रमांक दिल्यास
  • कुठल्या विशिष्ट व्यवहारात पॅन किंवा आधार क्रमांक देण्यात अयशस्वी ठरल्यास
  • आधार क्रमांक देणे पुरेसे नाही, तुम्हाला बायोमेट्रिक आयडेंटिटीलाही ऑथेंटिकेट करावं लागेल आणि जर हे करण्यात तुम्ही अपयशी ठरला तर तुम्हाला दंड भरावा लागेल

नियमांअतर्गत जर पॅन किंवा आधार क्रमांक योग्य पद्धतीने दिला नाही किंवा ते प्रमाणित करु शकले नाही तर बँक, वित्तीय संस्था इत्यादींवरही कारवाई होऊ शकते.

त्याशिवाय, जर तुम्ही दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये चुकीचा आधार क्रमांक दिला तर तुम्हाला या दोन्ही चुकांसाठी 10-10 हजार रुपये म्हणजेच 20 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक देताना काळजी घ्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *