अदानींच्या ताब्यातील बंदरांवर तीन देशांच्या जहाजांना बंदी, हजारो कोटींचं हेरॉईन जप्तीनंतर निर्णय

गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर 16 सप्टेंबर रोजी अंदाजे 3 हजार किलो वजनाचे हेरॉईन (ड्रग्ज) जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 20 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे

अदानींच्या ताब्यातील बंदरांवर तीन देशांच्या जहाजांना बंदी, हजारो कोटींचं हेरॉईन जप्तीनंतर निर्णय
अदानींच्या ताब्यातील मुंद्रा पोर्टवर हेरॉईनचा साठा जप्त
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 8:43 AM

मुंबई : गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे इराण (Iran), अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर (APSEZ port) प्रवेशबंदी असेल. याची अंमलबजावणी 15 नोव्हेंबरपासून होणार आहे.

अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. “15 नोव्हेंबरपासून अदानींच्या बंदरांवर इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या जहाज, कंटेनर कार्गोंना प्रवेश दिला जाणार नाही.” हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असेल. पुढील नोटीस येईपर्यंत या तीन देशांमधून येणाऱ्या जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.

काय आहे प्रकरण?

गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर 16 सप्टेंबर रोजी अंदाजे 3 हजार किलो वजनाचे हेरॉईन (ड्रग्ज) जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 20 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तालिबान आणि आयएसआयशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

डीआरआय महसूल गुप्तचर संचालनालयने ड्रग्ज तस्करी प्रकरणात ही जगातील सगळ्यात मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर डीआरआयकडून अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत छापेमारी करण्यात येत आहे. या तस्करीचे धागेदोरे हे अफगाणिस्तानात असल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.

अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण काय?

16 सप्टेंबर रोजी डीआरआय आणि कस्टम्स विभागाने अफगाणिस्तानातून आलेल्या दोन कंटेनरमधून मुंद्रा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर (एमआयसीटी) मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला. अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि आरोपींची धरपकड केल्याप्रकरणी आम्ही डीआरआयचे अभिनंदन करतो. डीआरआय आणि कस्टम्स विभागाला सरकारने बेकायदेशीर कार्गो उघडून तपासणी करण्याचे अधिकारी दिले आहेत. मात्र देशभरातील कुठलाही पोर्ट ऑपरेटर कंटेनरची तपासणी करु शकत नाही, असं अदानी समुहातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.

अदानी ग्रुपविरोधातील सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या आणि बदनामीकारक चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो. आमच्या कुठल्याही पोर्टवर उतरणाऱ्या कार्गोची तपासणी करण्याचे आमचे धोरण नाही, असंही अदानी ग्रुपने स्पष्ट केले होते.

हेरोईनचा सुगावा कसा लागला?

आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्यात आशी ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीनं अफगाणिस्तानमधून काही बाबी इम्पोर्ट केल्याची टिप डीआरआयला लागली. त्यातही यात ड्रग्ज असल्याचं टिप देणाऱ्यानं सांगितलं होतं. त्याच आधारावर मुंद्रा बंदरात आलेल्या दोन कंटेनरची झडती अधिकाऱ्यांनी घेतली. अधिकाऱ्यांना कंटेनरमध्ये ड्रग्जसारखी पावडर मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, ती पावडर टॅलकम पावडर असल्याचं सांगितलं गेलं. घटनास्थळावर गांधीनगरचे फॉरेन्सिक एक्स्पर्ट हजर होते. त्यांनी ती पावडर तपासली आणि त्यात हेरॉईन असल्याची खात्री केली. अगदी तंतोतंत सांगायचं तर पहिल्या कंटेनरमध्ये 1999.58 किलो हेरॉईन होती तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 988.64 किलो म्हणजेच 2 हजार 988.22 किलो एवढे हेरॉईन जप्त करण्यात आले. हे कंटेनर अफगाणिस्तानमधून जरी आले असले तरीसुद्धा ते इराणच्या बंदर अब्बास पोर्टमधून आलेले आहेत.

संबंधित बातम्या :

अदानींच्या ताब्यातील बंदरावर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, उलटसुलट चर्चांनंतर अदानींचं स्पष्टीकरण

बाप रे ! गुजरातमध्ये 9 हजार कोटीची हेरोईन जप्त, जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी उघड, अफगाण कनेक्शन

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.