राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ” खरं बोलणारी लोकं…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले,  खरं बोलणारी लोकं...
राहुल गांधी यांना दिलासा मिळताच आदित्य ठाकरे सुनावले खडेबोल, आता लोकसभेत...
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 8:24 PM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मोदी आडनावावरून केलेलं वक्तव्य राहुल गांधी यांना भोवलं होतं. तसेच या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. अखेर सुप्रीम कोर्टाने शिक्षेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या कोलारमध्ये एका निवडणूक सभेत राहुल गांदी यांनी भाषणात सांगितलं होतं की, ‘सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं असतं?’. या वक्तव्याप्रकरणी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होतं. तसेच दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन दिला होता. तसेच अपील करण्यासाठी वेळ देत शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित केली होती. या प्रकरणी भाजपा विरोधी पक्षांनी रान उठवलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे.

“मला वाटतं हा आदेश योग्य आहे. जर तुम्ही निकालाकडे पाहिलं तर कळेल की खूप महत्त्वपूर्ण आहे. आता खरं बोलणारे लोकं लोकसभेत पुन्हा येणार आहेत. या देशात तिरस्कार आणि सूडाचं राजकारण जिंकू शकत नाही. आम्ही या आदेशाचं स्वागत करतो. “, असं आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

दुसरीकडे, राहुल गांधी यांना दिलासा मिळाल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनीही आनंद व्यक्त केला आहे. “आमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आम्हाला आमच्या देशाच्या न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे. अशा निर्णयामुळे देशातील जनता खूश होईल. न्यायपालिकांवर सरकारचा दबाव नसल्याचं यातून स्पष्ट होईल”, असं रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितलं.

काय झालं होतं नेमकं या प्रकरणात?

राहुल गांधी यांना दोषी धरताच त्यांचं  24 मार्च 2023 रोजी लोकसभा सदस्यत्व गेलं होतं. त्यानंतर 3 एप्रिलला शिक्षेविरोधात सूरत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका फेटाळत निकाल कायम ठेवण्यात आला. त्यानंतर गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली. पण तिथेही निकाल विरोधात गेल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सुनावणी घेत मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. तसेच लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल केलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.