मोठी बातमी! अमेरिकेचा भारताला हादरवणारा धक्का, ट्रम्प यांची थेट मोठी घोषणा, नोकऱ्या सोडाव्या लागणार?
अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी व्यापारी डील होण्याची शक्यता आहे, चर्चा देखील सुरू आहे. मात्र त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली असून, ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिका सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता अमेरिकेनं H-1b व्हिसासंदर्भात मोठं पाऊल उचललं आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या हजारो भारतीय नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. H-1b व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांपुढे मोठं संकट निर्माण झालं आहे. याची सुरुवात सप्टेंबर 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे झाली होती.आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अमेरिकेच्या दूतावासातील व्हिसासाठीच्या मुलाखती या 2027 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यामुळे अमेरिकन कंपन्यांसाठी काम करणारे हजारो भारतीय नागरिक आता भारताच अडकून पडले आहेत.
सगळ्यात आधी अमेरिकन प्रशासनाकडून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकेच्या दूतावासातील व्हिसासाठीच्या मुलाखती या मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प प्रशासनाने आपला निर्णय बदलला आणि आता या मुलाखती थेट ऑक्टोबर 2027 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता अनेक जण भारतातच अडकून पडल्यामुळे त्यांच्या अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
दरम्यान त्यापूर्वी डोनाल्ड ट्र्म्प यांनी H-1b व्हिसाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, H-1b व्हिसाच्या शुल्कामध्ये देखील अमेरिकेकडून मोठी वाढ करण्यात आली, त्याचा देखील थेट मोठा फटका हा भारताला बसला, कारण जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक भारतीय नागरिक हे अमेरिकेमध्ये जॉब करतात. व्हिसाच्या शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे ज्यांना नव्याने अमेरिकेत नोकरीसाठी जाण्याची इच्छा आहे, त्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान नव्यानं व्हिसासाठी अर्ज केल्यास आता अमेरिकनं प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटची देखील कसून तपासणी करण्यात येणार आहे, त्यामध्ये जर अमेरिकेविरोधातील एक जरी पोस्ट आढळून आली तरी देखील व्हिसा रद्द होण्याची शक्यता आहे. एकीकडे अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी व्यापारी डील होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलणी सुरू आहेत, मात्र दुसरीकडे अमेरिका भारताला धक्क्यावर धक्के देणारे निर्णय घेत असल्याचं समोर आलं आहे.
