AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah : मोदींना सत्तेतून हटवल्यानंतरच मरणार म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांना अमित शाहंच सणसणीत प्रत्युत्तर

Amit Shah : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सोमवारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर जोरदार पलटवार केला. जो, पर्यंत पंतप्रधान मोदींनी सत्तेतून हटवत नाही, तो पर्यंत मरणार नाही असं खरगे म्हणाले होते. जम्मू-कश्मीर येथे एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्षांनी असं वक्तव्य केलं.

Amit Shah : मोदींना सत्तेतून हटवल्यानंतरच मरणार म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांना अमित शाहंच सणसणीत प्रत्युत्तर
PM Modi-mallikarjun kharge - Amit Shah
| Updated on: Sep 30, 2024 | 1:05 PM
Share

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. जम्मू-कश्मीरच्या जसरोटामध्ये ते एका निवडणूक सभेला काल संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पलटवार केला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी विनाकारण आपल्या आरोग्याच्या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओढलं. “काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात स्वत:चा पक्ष, नेते यांच्यापेक्षा पण अभद्र भाषा वापरली. आपल्या मनातील कटुता दाखवून दिली. व्यक्तीगत आरोग्याच्या विषयात पंतप्रधान मोदींना विनाकारणं ओढलं. पंतप्रधान मोदींना सत्तेवरुन हटवल्यानंतरच मरणार” असं खरगे म्हणाले.

“यातून काँग्रेसजनांच्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल किती द्वेष आणि भिती भरली आहे, ते दिसतं. ते सतत मोदींबद्दल असा विचार करतायत. खरगे यांच्या प्रकृतीसाठी मोदी प्रार्थना करतायत. मी स्वत: प्रार्थना करतो. आम्ही सर्व प्रार्थना करतो, दीर्घकाळ खरगे यांची प्रकृती स्वस्थ रहावी. त्यांना दीर्घायुष्य मिळावं. 2047 सालचा विकसित भारत त्यांनी पहावा” असं अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘लवकर मरणार नाही’

मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काश्मीरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लढणार असं त्यांनी म्हटलं. त्यासाठी काहीही झालं तरी चालेलं. “मी जम्मू-काश्मीरला असच सोडणार नाही. मी 83 वर्षांचा आहे. लवकर मरणार नाही. मोदींना हटवत नाही, तो पर्यंत जिवंत राहणार. तुमच म्हणण ऐकणार, तुमच्यासाठी लढणार” असं खरगे म्हणाले.

‘त्यासाठी मोदी जबाबदार’

“मोदीजी जम्मू-काश्मीरमध्ये येऊन युवकांच्या भविष्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेत. मागच्या 10 वर्षात संपूर्ण देशातील युवकांना अंधारात ढकललं आहे. त्यासाठी मोदी जबाबदार आहेत” अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.