AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीला आणखी एक झटका, आता हा पक्ष भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत

India alliance : लोकसभा निवडणुकीआधी आता इंडिया आघाडीला चौथा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण आणखी एक पक्ष भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत आहे, बोलणी झाली असून दिल्लीत याची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

इंडिया आघाडीला आणखी एक झटका, आता हा पक्ष भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत
| Updated on: Feb 06, 2024 | 10:09 PM
Share

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला तीन धक्के बसले आहेत. आधी ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला. पंजाबमध्ये देखील आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीए सोबत सहभागी झाले आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांना पुन्हा आपल्याकडे खेचले आहे. भाजपने आपल्या रणनीतीने मित्रपक्षांना आपल्या गोटात ओढून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भाजप आता आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जयंत चौधरी यांच्या आरएलडी आणि भाजपमध्ये युती होणार असल्याची माहिती आहे. यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात आरएलडीला 4 जागा मिळू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला आणखी एक झटका लागू शकतो. कारण भाजप एकएक करुन मित्रपक्षांना पुन्हा एकजा जवळ करु लागला आहे.

भाजपने इंडिया आघाडीतील आरएलडीला आपल्या गोटात खेचण्याची योजना आखली आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांच्यातील बोलणी जवळपास निश्चित झाली आहे. जयंत चौधरी दिल्लीत येणार असल्याचं देखील सांगितले जात आहे.  त्यानंतर युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते.

जयंत चौधरी यांना 4 जागा मिळणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत चौधरी यांच्या पक्षाला एकूण चार जागा मिळू शकतात. पश्चिम यूपीमध्ये त्यांची चांगली पकड आहे, त्यामुळे भाजपने त्यांना जवळ केले आहे. भाजप हायकमांडनेही यासाठी मान्यता दिली आहे. दोन्ही पक्षांची युती होणार हे निश्चित मानले जात आहे. याचा मोठा झटका अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला बसणार आहे.

अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जयंत चौधरी यांना 7 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहित आहे. पण आता भाजपने त्यांना आपल्याकडे खेचले आहे. युतीची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.

राममंदिराच्या लाटेवर भाजपला रोखणे कठीण असल्याचं अनेक घटकपक्षांना वाटत आहे. त्यामुळे हे पक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजपला देखील लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.