अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, निर्णय राखीव

गेल्या 70 वर्षांपासून देशात सुरु असलेल्या अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखीव (Ayodhya Case Last Hearing ) ठेवला आहे.

अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, निर्णय राखीव
Follow us
| Updated on: Oct 16, 2019 | 6:48 PM

नवी दिल्ली : गेल्या 70 वर्षांपासून देशात सुरु असलेल्या अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली. यात त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. मात्र निर्णय राखीव ठेवला.

निकाल राखीव (Ayodhya Case Last Hearing ) ठेवला आहे. आजपासून जवळपास 23 दिवसांनी म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायलयात हिंदू आणि मुस्लीम पक्षांनी आज (16 ऑक्टोबर) त्यांची बाजू मांडली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी सुनवाणी पूर्ण झाल्याचे सांगितले.

रामजन्मभूमी वादामुळे देशात अनेक राजकीय चढउतार पाहायला मिळाले. आता अनेक दशकांनंतर अखेर या प्रकरणावर 8 नोव्हेंबर पर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

LIVE UPDATE : 

[svt-event date=”16/10/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ] अयोध्या राम मंदिर-बाबरी मशीद जमीर वादाच्या खटल्याच्या निकालाची तारीख आज जाहीर होणार [/svt-event]

[svt-event date=”16/10/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वोच्च न्यायालय परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात [/svt-event]

[svt-event date=”16/10/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] आता आणखी वेळ दिला जाणार नसल्याची सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा निर्णय

[/svt-event]

[svt-event date=”16/10/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ] राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणावर आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार असल्याची शक्यता [/svt-event]

[svt-event date=”16/10/2019,11:06AM” class=”svt-cd-green” ] अयोध्या राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अखेरच्या युक्तीवादाला सुरुवात [/svt-event]

[svt-event date=”16/10/2019,11:06AM” class=”svt-cd-green” ] सर्व पाचही न्यायमूर्ती न्यायालयात पोहोचले

[/svt-event]

शेवटची सुनावणी

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात हिंदू पक्ष आपली बाजू मांडली. त्यानंतर मुस्लीम पक्षाच्या वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक तासाचा वेळ दिला गेला (Ayodhya Case Last Hearing ). बुधवारी हिंदू पक्षाचे वकील सी.एस. वैद्यनाथन यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ दिला गेला. तसेच, हिंदू पक्षाच्या इतर वकीलांनाही इतकाच वेळ दिला जाईल. त्यानंतर मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांना उत्तर देण्यासाठी एक तासाचा वेळ मिळेल.

सुनावणीचा 40 वा दिवस

गेल्या 6 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर रोज सुनावणी सुरु होती. आज या सुनावणीचा 40 वा दिवस आहे. हिंदू पक्ष, मुस्लीम पक्ष आपआपल्या बाजू न्यायालयात मांडत आहेत. हिंदू पक्षाच्या वकीलांकडून ASI रिपोर्ट, पुराण, ग्रंथ, भावनिक आवाहनही करण्यात आलं, तसेच अनेकदा तीव्र युक्तीवादही झाले. दुसरीकडे, मुस्लीम पक्षाने ASI रिपोर्ट, सद्य स्थिती आणि इस्लामिक इतिसाह मांडला.

युक्तीवाद संपला, निर्णय कधी?

सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी शेवटची सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. पण गुरुवारीही (17 ऑक्टोबर) हे प्रकरण सुरु राहील. गुरुवारी मोल्डिंग ऑफ रिलीफवर युक्तीवाद होईल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय कारवाई बाबत निर्णय देऊ शकतं.

या प्रकरणाची सुनावणी 10 ऑक्टोबर पूर्वी संपवण्याचा प्रयत्न असल्याचं, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांनी सांगितलं होतं. कारण, निर्णय लिहायला एक महिन्यापर्यंतचा वेळ लागेल.

सरन्यायाधीश इतिसाह घडवणार?

सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते यापूर्वी अयोध्या प्रकरणावर निर्णय देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर युक्तीवाद संपला तर 17 नोव्हेंबरपर्यंत एक महिनाच राहतो. त्यामुळे अयोध्या प्रकरणावर निर्णय होण्याची शक्यता वाढली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याव्यतीरिक्त या प्रकरणाच्या संविधान पीठात न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस.ए. नजीर यांचाही समावेश आहे.

काय आहे अयोध्या जमीन वाद?

राम जन्मभूमीचा वाद हा अनेक वर्ष जुना आहे. शिवाय हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच तणावाचा मुद्दा राहिलेला आहे. अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बनवण्याची मागणी आहे. या जागेवर रामाचं मंदिर तोडून बाबरी मशीद बांधण्यात आली असा हिंदूंचा दावा आहे.

हिंदूंच्या मते, 1530 मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकीने मंदिराच्या जागी मशीद बांधली. त्यामुळेच 90 च्या दशकात राम जन्मभूमी प्रकरणाने देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती.

अयोध्येतील 2.77 एकर जागेचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यात समान वाटप केले जावे, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने चार वेगवेगळ्या दिवाणी दाव्यांमध्ये 2010 साली दिला होता. या निर्णयाला 14 वेगवेगळ्या याचिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.