‘बुलबुल’ चक्रीवादळाचा कहर, 5 लाख घरं उद्ध्वस्त, 23,811 कोटींचं नुकसान

पश्चिम बंगालमध्ये ‘बुलबुल' चक्रीवादळाने (Bulbul Cyclone in Wesh Bengal) प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळाने बंगालमधील तब्बल 5 लाख घरं उद्ध्वस्त केली आहेत.

‘बुलबुल’ चक्रीवादळाचा कहर, 5 लाख घरं उद्ध्वस्त, 23,811 कोटींचं नुकसान

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ‘बुलबुल’ चक्रीवादळाने (Bulbul Cyclone in Wesh Bengal) प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळाने बंगालमधील तब्बल 5 लाख घरं उद्ध्वस्त केली आहेत. तसेच 23,811 कोटींचं नुकसान झालं आहे. वादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालमधील 3 जिल्ह्यांना बसला आहे. याचा जवळपास 35 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने ‘बुलबुल’ चक्रीवादळाने ((Bulbul Cyclone in Wesh Bengal)) झालेल्या नुकसानीबाबत शनिवारी (16 नोव्हेंबर) केंद्र सरकारला एक अहवाल देखील पाठवला आहे.

केंद्रीय दलाच्या सदस्यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांच्यासोबत बैठकही घेतली आहे. यावेळी या पथकालाही वादळाच्या नुकसानीबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्यांनी चक्रीवादळ्याच्या नुकसानीची माहिती घेतली आहे. या पथकाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण 24 परगना आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्याचा दौराही केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अहवालाच्या आधारे माहिती दिली, “राज्यात बुलबुल चक्रीवादळाने 3 प्रभावित जिल्ह्यांमध्ये एकूण 23,811 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 35 लाख लोकांवर याचा थेट परिणाम झाला आहे. या वादळाने जवळपास 5,17,535 घरं उद्ध्वस्त झाली आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीवरुन राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या, “बुलबुल वादळाने नुकसान झालेल्या नागरिकांना मदत पोहचवण्याच्या कामात राजकारण व्हायला नको.” राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी देखील बॅनर्जी यांच्या मताशी सहमती दाखवली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *