AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये शानदार विजय, आता किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता? PM मोदींचे पुढील टार्गेट काय?

BJP Power States : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. बिहार निवडणूकीतील विजयासह भाजपचा भगवा आता देशातील प्रमुख राज्यांमध्ये फडकताना दिसत आहे. कोणत्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे ते जाणून घेऊयात.

बिहारमध्ये शानदार विजय, आता किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता? PM मोदींचे पुढील टार्गेट काय?
BJP Power State
| Updated on: Nov 14, 2025 | 10:42 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. या निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेससह इतर पक्षांना मोठा फटका बसला आहे. बिहार निवडणूकीतील विजयासह भाजपचा भगवा आता देशातील प्रमुख राज्यांमध्ये फडकताना दिसत आहे. बिहारमधील विजयानंतर आताा किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुढील लक्ष्य काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची राज्ये भाजपच्या ताब्यात

बिहार निवडणुकीतील यशानंतर भाजप आणि एनडीए आता 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता आहे. यातून हे स्पष्ट होते की देशातील महत्त्वाची राज्ये ही भाजपच्या ताब्यात आहेत.

BJP Power in These states

या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजप सत्तेपासून दूर आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख, मणिपूर, मिझोराम आणि सिक्कीममध्येही भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही. यातील काही राज्ये राजकीयदृष्ट्या लहान आहेत. भाजप दक्षिण भारतात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी द्रमुक, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांची ताकद जास्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या राज्यांवर नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विजयानंतर कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना म्हटले की, ‘आजच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांना केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगाल ओरिसात ही नव्या ऊर्जेने भारावून टाकलं आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.’ याचाच अर्थ नरेंद्र मोदी यांचे पुढील लक्ष्य हे या राज्यांमध्ये सत्ता मिळवणे हे आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ