Bihar Election Results 2025 : 40 टक्के महिला मतदारांच्या हातात 10 हजारांची चावी; NDA च्या सत्तेचा राजमार्ग प्रशस्त करणार?
Bihar Election Results 2025 : बिहार निवडणुकीत महिला मतदार करिष्माई कामगिरी दाखवण्याची शक्यता आहे. त्यांना एनडीएने दहा हजारांचा आर्थिक पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत निर्णयाक असेल.

BJP-Nitish Kumar: बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये महिला मतदारांची संख्या सत्तेची गणितं मोडीत काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला मतदारांनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. दोन्ही टप्प्यातील एकत्रित गणनेनुसार, या निवडणुकीत 71.61 टक्के महिलांना मतदानाचा हक्क बजावला आहे. 2020 मध्ये महिला मतदानाचे प्रमाण 59.69 टक्के होते. म्हणजे गेल्या वेळीच्यात तुलनेत यंदा 10 टक्के अधिक महिलांना मतदान केले आहे. महिला मतदारांचा हा 10 टक्के वाटा अनेकांचे राजकीय भविष्य पणाला लावू शकतो. अनेकांना लॉटरी लावू शकतो. एक्झिट पोलच्या सर्व्हेत एनडीएच्या परतीचा अंदाज या महिला शक्तीकरणाच्या आधारेच लावण्यात येत आहे. महिला मतदारांची मतदान प्रक्रियेतील सक्रियेता भाजप-नितीश कुमार यांच्या बाजूने झुकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सत्ताविरोधी लाट या महिला लाटेत वाहून गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
’10 हजार’ रुपयांची कमाल
बिहारमधील 1 कोटी 51 लाख महिलांना मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचा सन्माननिधी देण्यात आला. कुटुंबातील एका महिलेला लाभाचे दहा हजार रुपये मिळाल्याचा प्रभाव कुटुंबातील इतर सदस्यांवर पडला. सर्व कुटुंबच आनंदून गेले. म्हणजे केवळ 1.51 कोटी महिलाच नाहीतर कुटुंबातील सदस्य सुद्धा अनुकूल झाले. त्याचा फायदा अर्थातच सत्ताधाऱ्यांना होणार आहे. महिला मतदानात मोठी उसळी
पहिल्या टप्प्यात पाटणा सोडून इतर 17 जिल्ह्यांमध्ये महिला मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा अधिक होती. 18 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये महिला मतदानाचा टक्केवारी 70 पेक्षा जास्त दिसली सर्वाधिक समस्तीपूर जिल्ह्यात 77.42 टक्के महिला मतदारांचा सक्रिय सहभाग दिसला. म मधेपुरा जिल्ह्यात 77.04 टक्के महिलांनी मतदान केले. हा जिल्हा महिला मतदानात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुजफ्फरपूर तिसऱ्या क्रमांकावर आला, येथे 76.57 टक्के महिलांनी मतदान केले. तर दुसऱ्या टप्प्यात असे 7 जिल्हे आहेत जिथे 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. यामध्ये कटिहार, किशनगंज, पूर्णिया, सुपौल, पूर्वी चंपारण, पश्चिम चंपारण आणि बांका यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानाचा टक्केवारी 10 टक्के अधिक आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला.
31 लाख लाखपती जीविकादीदी
31 लाखांहून अधिक जीविकादीदी लखपती असलेले बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक आहे. त्या लखपती दीदी ठरल्या आहेत. जीविका दीदींपासून लाखपती होण्याची योजना 2023 मध्ये सुरू झाली होती. त्यामुळे या महिलांचा मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याचा अंदाज बांधता येतो. ही मोठी चाल नितीश कुमार सरकारच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे सत्तेचा राजमार्ग एनडीएसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
