मला तेजस्वीने घरातून हाकलले… प्रश्न विचारल्यास चप्पलने… रोहिणी आचार्य यांचा गंभीर आरोप
Rohini Acharya : लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आता रोहिणी यांनी भाऊ तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लालूंच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर आता रोहिणी यांनी भाऊ तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रोहिणी यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
रोहिणी आचार्य यांचा गंभीर आरोप
आज दुपारी सोशल मीडियाद्वारे राजकारण सोडण्याची घोषणा केल्यानंतर सायंकाळी रोहिणी या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना रोहिणी यांनी, ‘माझे कोणतेही कुटुंब नाही. आता संजय, रमीज आणि तेजस्वी यादव यांना जा आणि विचारा. या लोकांनी मला घराबाहेर काढले. त्यांना पराभवाची जबाबदारी घ्यायची नाहीये. जो चाणक्य होईल त्याला प्रश्न विचारला जाईल. पक्षाची ही अवस्था का झाली असा प्रश्न कार्यकर्ते चाणक्य यांना प्रश्न विचारत आहेत. तुम्ही संजय, रमीज आणि तेजस्वी यादव यांचा उल्लेख केला तर तुम्हाला घराबाहेर काढले जाईल. तुमची बदनामी केली जाईल. तुम्हाला शिवीगाळ केली जाईल आणि चप्पलांनी मारहाण केली जाईल.’ असा गंभीर आरोप केला आहे.
#WATCH पटना, बिहार: RJD नेता रोहिणी आचार्य ने राजनीति छोड़ने पर कहा, “मेरा कोई परिवार नहीं है। उन्होंने ही मुझे परिवार से निकाला है। उन्हें जिम्मेदारी नहीं लेनी है… सारी दुनिया सवाल कर रही है कि पार्टी का ऐसा हाल क्यों हुआ है?…” pic.twitter.com/XcgyhKV8RA
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2025
राजकारण सोडण्याची घोषणा
आरजेडीचा बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर रोहिणी यादव यांनी राजकारण आणि कुटुंब सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत ट्वीट करताना रोहिणी म्हणाल्या होत्या की, ‘मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करायला सांगितले आहे.’ त्यानंतर आता रोहिणी यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत.
रोहिणी संजय यादववर नाराज का आहेत?
लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यापासून रोहिणी आचार्य संजय यादववर नाराज आहेत. तेज प्रताप यादव देखील पक्षातून आणि कुटुंबातून बाहेर पडण्यासाठी संजय यादव म्हणजे जयचंद यांना जबाबदार धरत आहेत. रोहिणी यांच्या मते संजय यादव हे पक्षाचे नेते व कार्यकर्ते आणि तेजस्वी यादव यांच्यात अडथळा आहेत. त्यामुळेच रोहिणी त्यांच्यावर नाराज आहेत.
