साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवलं

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:45 PM, 6 Mar 2021
साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवलं

मुंबई : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलंय. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आता त्यांना मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रज्ञा सिंह मागील अनेक दिवसांपासून बऱ्याच आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच खबरदारी म्हणून त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात येत आहे.

प्रज्ञा सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. शुक्रवारी (5 मार्च) सायंकाळी त्यांचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) अचानक वाढला. अनेक प्रयत्न करुनही रक्तदाब कमी झाला नाही. आज (6 मार्च) तर त्यांना श्वास घेण्यासही त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्टर्ड प्लेनने त्यांना मुंबईत आणण्यात आलं. डिसेंबर 2020 मध्ये कोरोना संसर्गानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गंभीर आरोप

साध्वी प्रज्ञा सिंह मध्यप्रदेशातील भोपाळ येथून खासदार आहेत. त्यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गंभीर आरोप आहेत. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्यांच्या विरोधात मुंबईतील सेशन कोर्टात खटला सुरू आहे.

प्रज्ञा सिंग यांची वादग्रस्त वक्तव्य

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी याआधी अनेक वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्यं केलेली आहेत. मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं, असं साध्वी म्हणाल्या होत्या. प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.

हेही वाचा :

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली

साध्वी प्रज्ञा आता ‘शूद्रांवर’ घसरल्या, नव्या वादाला तोंड फुटलं

प्रज्ञा सिंह यांनी स्वतःची शूद्र म्हणून कायदेशीर नोंद करावी, सचिन खरात यांचे आव्हान

Pragya Thakur | खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भर कार्यक्रमात भोवळ

व्हिडीओ पाहा :

BJP MP Sadhvi Pragya Singh Thakur admit in Mumbai due to health issue