ब्लू आधार कार्ड घरबसल्या मिळणार; केंद्रावर जाण्याची नाही गरज, UIDAI चे अधिकारी थेट घरी येणार, कसे ते जाणून घ्या
Blue Aadhar Card : आता ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज नाही. UIDAI चे अधिकारी आणि कर्मचारी घरी येऊन ब्लू आधार कार्ड तयार करून देतील, पण त्यासाठीची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे का?

भारतात आधार कार्ड आता प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा मजबूत दस्तावेज आहे. देशात आता जवळपास प्रत्येक नागरिकाकडे त्याचे आधार कार्ड आहे. सरकारी योजना, शाळेचा दाखला, बँकिंगपासून ते मोबाईल सिम खरेदीपर्यंत सर्व कामे ही आधार कार्डमार्फत करण्यात येतात. देशात लहान मुलांसाठी ब्लू आधार कार्डची सुविधा आहे. लहान मुलांचे आधार कार्ड तयार करणे तसे जिकरीचे काम आहे. अनेकदा मुलं या प्रक्रियेत रडारड करतात. ती घाबरतात. आता ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज नाही. लहान मुलांचे ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) अधिकारी घरपोच येतील.
UIDAI चा अधिकारी घरी
आता नवजात बालकांना अथवा कमी वयाच्या बालकांना आधार केंद्रावर ब्लू कार्ड तयार करण्यासाठी घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. UIDAI ने एक नवीन व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे छोट्या मुलांना आधार कार्ड तयार करण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. त्यासाठी पालकांना बाहेर जाण्याची गरज नाही. UIDAI अधिकार स्वतः घरी येऊन ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी येतील. काय आहे त्याची प्रक्रिया…
काय आहे ब्लू आधार कार्ड?
देशातील जवळपास 90 टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे. लहान मुलांचे सुद्धा आधार कार्ड तयार होते. त्याला ब्लू आधार कार्ड असे म्हटल्या जाते. हे आधार कार्ड आई-वडिलांच्या आधारशी लिंक असते. हे आधार कार्ड तयार करण्याची प्रक्रिया फार किचकट नसते. हे कार्ड तयार करण्यासाठी UIDAI चे अधिकारी घरपोच येतील.
अधिकारी घरी येऊन तयार करतील ब्लू आधार कार्ड
आधार केंद्रावर न जाता ब्लू आधार कार्ड घरी तयार करण्यासाठी अर्ज करता येईल. अर्ज केल्यानंतर UIDAI अधिकारी घरी येतील. ही प्रक्रिया करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावरील होम पेजच्या Service request हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुमच्यासमोर दोन पर्याय येतील. त्यामध्ये तुम्हाला IPPB Customers हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Child Aadhar Enrollment वर क्लिक केल्यावर नवीन अर्ज उघडेल. या फॉर्ममध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि जवळच्या पोस्ट ऑफिसचा पत्ता अशी माहिती द्या. हा अर्ज जमा झाल्यावर 10 दिवसांनी पोस्ट कार्यालयातील कर्मचारी तुमच्या घर येऊन मुलाचे आधार कार्ड तयार करतील.
