AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिस्टम नव्हे, मोदींचं नेतृत्व फेल, सर्वपक्षीय बैठक बोलवा; सोनिया गांधींची मागणी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. (Call urgent all-party meet on Covid, Modi govt has failed people: Sonia Gandhi)

सिस्टम नव्हे, मोदींचं नेतृत्व फेल, सर्वपक्षीय बैठक बोलवा; सोनिया गांधींची मागणी
sonia gandhi
| Updated on: May 07, 2021 | 7:30 PM
Share

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना संकट रोखताना सिस्टिम फेल झालेली नाही. तर मोदी सरकार फेल झाली आहे. मोदी निवडणुकीत मश्गूल राहिले. कोरोना संकटाबाबत दिलेल्या इशाऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच कोरोना संकट रोखण्यासाठी तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली. (Call urgent all-party meet on Covid, Modi govt has failed people: Sonia Gandhi)

मोदी सरकारने लोकांना मदत करण्याऐवजी आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. या वर्षाच्या सुरुवातीलाच अहंकाराने भरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लढाई जिंकल्याचा दावा केला. त्यांच्या पक्षाने मोदींचं गुणगाण गायलं, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

मोदींकडून कानाडोळा

संसदेच्या स्थायी समितीनेही कोरोनाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. परंतु, मोदींनी त्याकडेही दुर्लक्ष केलं. मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. योग्यवेळी व्हॅक्सीनची ऑर्डर दिली नाही. सर्वच इशाऱ्यांकडे त्यांनी कानाडोळा केला, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपशासित सरकारे हुकूमशहा

कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे इशारे दिलेले असतानाही आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात आली नाही. ऑक्सिजन, औषधे आणि व्हेंटिलेटर आदी व्यवस्था उभारल्या नाहीत. नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाजपशासित राज्यातील सरकार हुकूमशहासारखे वागले. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावाही त्यांनी केला.

स्थायी समिती स्थापन करा

मी थेटपणे सांगते. आपली यंत्रणा फेल झालेली नाही. तर मोदी सरकार फेल झाली आहे. मोदी सरकार कोरोनाची लढाई लढण्यास समर्थ नाही. म्हणूनच आपण या परिस्थितीचा सामना करत आहोत. मोदी सरकारला लोकांच्या बाबतीत काहीही संवेदना राहिलेली नाही. त्यामुळेच आज भारतीय असह्य झालेले आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला. मोदींनी आता सर्वपक्षीय बैठक बोलवावी. ही काही विरोधक विरुद्ध सत्ताधारी अशी लढाई नाही. ही कोरोनाच्या विरोधातील लढाई आहे. यासोबत एक स्थायी समिती स्थापन करावी, एकजुटीने कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी ही पावलं उचलली पाहिजे, असं सांगतानाच काँग्रेस लवकरच कार्यसमितीची बैठक बोलावणार असल्याचंही त्या म्हणाल्या. (Call urgent all-party meet on Covid, Modi govt has failed people: Sonia Gandhi)

संबंधित बातम्या:

‘बंगालमधील राजकीय हिंसेत 16 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा

भाजपच्या चौथ्या आमदाराचं कोरोनाने निधन, एकाच राज्यात चार आमदारांनी जीव गमावला!

‘कोरोना विरुद्ध लढा, पंतप्रधान मोदींशी नाही’, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

(Call urgent all-party meet on Covid, Modi govt has failed people: Sonia Gandhi)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...