Omicron: केंद्राकडून सर्व राज्यांना गाईडलाईन जारी; वाचा ओमिक्रोन वेरिएंटचा धोका टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल?

सर्व राज्यांनी 'टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण' (Test-Track-Treat Vaccination) या तत्त्वाची आणि कोविड योग्य वर्तनाची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. आणि MoHFW मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधात्मक उपाय करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जवळपास सर्व राज्यांनी नवीन कोविड प्रकाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Omicron: केंद्राकडून सर्व राज्यांना गाईडलाईन जारी; वाचा ओमिक्रोन वेरिएंटचा धोका टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल?
Omicron Variant
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 3:38 PM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारने काल कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन बैठक बोलावली होती. आज, केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना नवीन गिल्डलाइन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत घ्यावयाची खबरदारी असलेले पत्र जारी केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर, विशेषतः ‘हाय रिस्क’ देशांतील प्रवाशांवर कठोर पाळत ठेवणे, नियमित तपासणी, कोविड चाचणी, त्यांच्या मागील प्रवासाच्या नोंदी आणि त्यांचे नमुने त्वरित जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवणे, अशा सुचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मुख्य सचिवांना दिल्या गेल्या आहेत.

राज्यांमध्ये RT-PCR चाचण्यांचे प्रमाण वाढवणे

पत्रात राज्यांना कोविड चाचणी पायाभूत सुविधा वाढवण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कोविड विषाणूची कोणतीही लाट असल्यास, सुधारित चाचणी केंद्रे कार्यरत असावीत. काही राज्यांमध्ये RT-PCR चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. पुरेशी चाचणी नसल्यास, संसर्ग पसरण्याची खरी पातळी निश्चित करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे, राज्यांनी चाचण्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

हॉटस्पॉट्सचे सतत निरीक्षण

ज्या भागात अलीकडील पॉझिटिव्ह केसेस जास्त आहेत, त्या हॉटस्पॉट्सचे सतत निरीक्षण करणे. सर्व हॉटस्पॉट्समध्ये, चाचण्या करून पोसिटीव नमुने नियुक्त INSACOG लॅबमध्ये त्वरीत जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश दिले गेले आहेत. या प्रयोगशाळा भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या (NCDC) अंतर्गत आहेत.

कुठल्याही हॉटस्पॉट्सला लगेच कंटेनमेंट झोन म्हणून निर्धारित करण्याच्याही सुचना आहेत. केंद्र सरकारच्या पत्रात असेही म्हटले आहे की राज्य सरकारने उपचारासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा तयार कराव्यात, ज्या संपूर्ण राज्य क्षेत्रामध्ये आणि विशिष्ट ठिकाणी केंद्रित केले जाऊ नये.

सर्व राज्यांनी ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण’ (Test-Track-Treat Vaccination) या तत्त्वाची आणि कोविड योग्य वर्तनाची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. आणि MoHFW मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधात्मक उपाय करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जवळपास सर्व राज्यांनी नवीन कोविड प्रकाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

हे ही वाचा

Maharashtra Corona Guidelines | नव्या कोरोना विषाणूमुळे यंत्रणा अलर्टवर, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी

Omicron : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभर उलथापालथ, कोणत्या देशात काय नवे नियम? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.