रद्द केलेला विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव

विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलात कायम राहावा म्हणून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (centre government appeal Supreme Court to implement adultery law in armed forces)

रद्द केलेला विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव
सुप्रीम कोर्ट
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 2:24 PM

नवी दिल्ली: विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलात कायम राहावा म्हणून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विवाहबाह्य संबंधाचा कायदा (भादंवि कलम 497) रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. हा कायदा रद्द करण्याचा निर्णय सशस्त्र दलाला लागू करण्यात येऊ नये, असं केंद्राने म्हटलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस जारी केली आहे. (centre government appeal Supreme Court to implement adultery law in armed forces)

केंद्र सरकारने कोर्टात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस जारी करून हे प्रकरण सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडे पाठवलं आहे. या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे करण्याची अपील करण्यात आली आहे. सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्याला सहकाऱ्याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्यास शिस्तभंगाच्या आधारे सेवेतून काढून टाकलं जातं. त्यामुळे विवाहबाह्य संबंधाच्या अनुषंगाने जो निर्णय देण्यात आला आहे, तो सशस्त्र दलात लागू होणार नाही, असा युक्तिवाद केंद्राने या याचिकेत केला आहे. त्यावर आज सुनावणी करताना जस्टिस आर. एफ. नरीमन, जस्टिस नवीन सिन्हा आणि जस्टिस के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने केंद्राच्या याचिकेवर ही नोटीस जारी केली आहे.

2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधाचा कायदा रद्द केला होता. त्यावेळी कोर्टाने अशाप्रकारचे संबंध हे गुन्ह्याच्या श्रेणीत येणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, हे संबंध घटस्फोटाचा आधार होऊ शकतात, असंही कोर्टाने नमूद केलं होतं.

काय होता कायदा?

यापूर्वी भादंवि कलम 497 च्या अंतर्गत विवाहबाह्य संबंध हा गुन्हा असल्याचं मानलं जात होतं. त्यानुसार असे संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना 5 वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती. एखाद्या विवाहित महिलेशी तिच्या सहमतीने किंवा सहमतीशिवाय संबंध ठेवल्याप्रकरणी ही शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. त्यातही महिलेच्या पतीने पुराव्यासह तक्रार केली तरच हा गुन्हा नोंदवला जाण्याचीही तरतूद होती. (centre government appeal Supreme Court to implement adultery law in armed forces)

संबंधित बातम्या:

निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट, रेखा शर्मांच्या विधानाने खळबळ

सुप्रीम कोर्टाची कृषी कायद्यांना स्थगिती, चार सदस्यीय समितीवर शरद पवारांचे मत काय?

जगभरात भारतीय कोरोना लसी सर्वाधिक स्वस्त, अफवांवर विश्वास ठेवू नका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

(centre government appeal Supreme Court to implement adultery law in armed forces)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.