AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chayan Dutta Chandrayaan 3 : आई-बाप दुकान चालवतात, लेकाने चंद्रावर यान सोडलं, जाणून घ्या

चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण आज संपूर्ण देशाने पाहिले आहे. मात्र, आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आसामच्या उत्तरेकडील एका गावात मोठा उत्साह पाहायला मिळाला. याचं कारण म्हणजे या प्रक्षेपणाची कमान आसामच्या एका सुपुत्राने सांभाळली होती. 

Chayan Dutta Chandrayaan 3 : आई-बाप दुकान चालवतात, लेकाने चंद्रावर यान सोडलं, जाणून घ्या
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 14, 2023 | 10:57 PM
Share

मुंबई : भारताची ‘चांद्रयान 3′ मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली. सर्व देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. LVM3-M4 रॉकेट द्वारे प्रक्षेपित केलेल्या मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने सांगितले की 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चं संध्याकाळी 5.47 वाजता सॉफ्ट लँडिंग केलं होणार आहे.

चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण आज संपूर्ण देशाने पाहिले आहे. मात्र, आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आसामच्या उत्तरेकडील एका गावात मोठा उत्साह पाहायला मिळाला. याचं कारण म्हणजे या प्रक्षेपणाची कमान आसामच्या एका सुपुत्राने सांभाळली होती.

आसामच्या या सुपुत्राचं नाव आहे चयन दत्ता. चयन दत्ता यांनी चांद्रयान 3 मिशनमध्ये डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टरची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज त्यांचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. चयन यांचे आई-वडील हे लखीमपुरमध्ये एक दुकान चालवतात. तसेच मुलाच्या या कामगिरीनंतर त्यांचे वडील रणजित दत्ता म्हणाले की, आमचा मुलगा सर्वांच्या आशीर्वादाने तिथपर्यंत पोहोचला आहे.

दरम्यान, चयंत दत्ता तेजपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते अवकाश विभागाच्या युवा उपग्रह केंद्रात वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. चयन हे जानेवारीमध्ये आपल्या घरी आले होते. त्यानंतर ते कामावरती परत आल्यानंतर घरच्यांसोबत फोनवर शेवटचे बोलले होते.  सध्या चयन यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतंय.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.