AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जातीच्या मुलींचा रेट 16 लाख! छांगूर बाबा प्रकरणात नवा खुलासा; मुंबई-पुण्याशी कनेक्शन काय?

उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये अवैध धर्मांतराचा आरोपी छांगूर बाबाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या बेकायदेशीर कोठीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली. छांगूर बाबा गरीब लोकांना पैशाचे प्रलोभन दाखवून धर्मांतर करायचा आणि जातीनुसार मुलींचे वेगवेगळे दर ठरवायचा. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून, मुंबई आणि पुण्याशीही याचा संबंध असल्याचे समोर आले आहे.

या जातीच्या मुलींचा रेट 16 लाख! छांगूर बाबा प्रकरणात नवा खुलासा; मुंबई-पुण्याशी कनेक्शन काय?
छांगूर बाबाला अटक करण्यात आली. त्याच्या कोठीवरही बुलडोझर फिरवण्यात आला Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Jul 08, 2025 | 4:40 PM
Share

अखेर छांगूर बाबाला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या कोठीवरही बुलडोझर फिरवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमद्ये छांगूर बाबाच्या नावानने जलालुद्दीन प्रसिद्ध होता. त्याने तिथेच त्याची कोठी तयार करून अवैध धंदे सुरू केले होते. जबरदस्तीने धर्मांतर करायचा. त्याचा पर्दाफाश झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर छांगूरच्या कोठीला नोटीस चिपकवून सात दिवसाची डेडलाईन दिली. अखेर आज ही कोठी जमीनदोस्त करण्यात आली आहे.

बलरामपूरच्या उतरौलामध्ये ही कोठी होती. ही कोठी बेकायदेशीर होती. त्यामुळे ती हटवण्याची नोटिस चिपकवण्यात आली होती. ही बेकायदेशीर कोठी हटवली नाही तर बुलडोझर चालवला जाईल. सात दिवसाची डेडलाईन देण्यात येत आहे. असं या नोटिशीत म्हटलं होतं. ही कोठी ग्रामसभेच्या जमिनीवर असल्याने ही नोटीस देण्यात आली होती. तहसीलचे अधिकारी आणि पोलिसांनी मधपूर गावात येऊन छांगूरच्या कोठीला नोटीस चिपकवली होती.

जात पाहून मुलींचे रेट…

यूपी एटीएसने नुकतेच छांगूर बाबा आणि त्याची सहकारी नीतू ऊर्फ नसरीनला बलरामपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर अवैध धर्मांतराच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला. छांगूर बाबा गरीब आणि असहाय लोकांना पैशाचं प्रलोभन दाखवून त्यांचं धर्मांतर करायचा. खास करून हिंदू मुलींना तो टार्गेट करायचा. तो वेगवेगळ्या जातीच्या मुलींचे वेगवेगळे रेट ठरवायचा. ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट 15 ते 16 लाख रूपये असायचा. त्यासाठी परदेशातून 100 कोटी रुपयांचा फंडिंग यायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईपासून बलरामपूरपर्यंत…

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, छांगूरचं मुंबईशीही कनेक्शन होतं. मुंबईतील नवीन रोहरा आणि त्याची बायको नीतूला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचीह धर्मांतर घडवून आणलं होतं. त्यांना बलरामपूरला आणण्यात आलं. नीतूला नसरीन आणि नवीनला जमालुद्दीन नावाने ओळखलं जाऊ लागलं. नवीनला 8 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी केली असता छांगूरने एक वर्षात विदेशातून फंडिंग मिळवून कोट्यवधीची संपत्ती जमवली आहे. त्यात शोरूम, बंगले आणि लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

कोर्टाच्या क्लर्कची बायको…

उतरौलाच्या एका न्यायालयातील क्लर्क राजेश उपाध्यायशीही छांगूरचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. जमिनीच्या खरेदी विक्रीवरून छांगूर आणि अहमद नावाच्या व्यक्तीमध्ये वर्चस्वाची लढाई होती. या काळात छांगूरची भेट लिपिक राजेशशी झाली. राजेशने त्याचा खटला चालवण्यासाठी मोठी मदत केली होती.

त्यानंतर पुण्यातील 16 कोटी रुपयांच्या जमिनीच्या खरेदी करारात राजेशची पत्नी संगीताला भागिदार करण्यात आलं होतं. यात नफ्यातील वाटा देण्याचंही आश्वासन होतं. पण राजेशने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही एटीएसने राजेश आणि त्याच्या पत्नीला आरोपी बनवलं आहे. त्यांची चौकशी लवकरच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.