दोन डोके असलेल्या बाळाचा जन्म; कुटुंबीयांचा मुल रुग्णालयात सोडून पळ, डॉक्टरांनी घेतले दत्तक

झारखंडच्या रिम्स  (RIMS) रुग्णालयामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्दयी मातेने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बालकाला रुग्णालयातच सोडून पळ काढला आहे.

दोन डोके असलेल्या बाळाचा जन्म; कुटुंबीयांचा मुल रुग्णालयात सोडून पळ, डॉक्टरांनी घेतले दत्तक
व्याधीग्रस्त बाळाला सोडून आई-वडिलांचा पळ
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 7:48 AM

नवी दिल्ली : झारखंडच्या रिम्स  (RIMS) रुग्णालयामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्दयी मातेने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बालकाला रुग्णालयातच सोडून पळ काढला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबंधित बालक हे जन्माजात ओसीपीटल मेनिन्गोकोकल एन्सेफॅलोसिल (Occipital  Meningoencephalocele)  आजाराने ग्रस्त होते. या आजारामध्ये डोक्याच्या मागचा भाग हा बाहेर आलेला असतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला दोन डोके असल्याचा भास होतो.

दोन डोके असल्याचा समज

दरम्यान हे बालक ओसीपीटल मेनिन्गोकोकल एन्सेफॅलोसिल पीडित असल्याने, त्याला दोन दोन डोके असल्याचा समज त्याच्या घरच्यांचा झाला. त्यांनी त्याच अवस्थेमध्ये बालकाला रुग्णालयात सोडून पळ काढला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने पोलिसात तक्रार देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, तपासाला सुरुवात केली. मात्र संबंधित कुटुंबाने दिलेला घरचा पत्ता देखील चुकीचा असल्याचे तपासातून समोर आले आहे.  त्यामुळे या बालकाला दत्तक घेण्याचा निर्णय या रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला असून, डॉक्टरांच्या वतीने चालवण्यात येणारी एनजीओ या मुलाचा सांभाळ करणार आहे.

बालकावर शस्त्रक्रिया

या बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या डोक्याचा अतिरिक्त भाग काढून टाकण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर या बालकाची प्रकृती स्थिर असून, पुढील दहा दिवस त्याला बालरोग तज्ज्ञांच्या निगरानीत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला एनजीओमध्ये दाखल करण्यात येईल. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या मुलाला चमचाच्या मदतीने सध्या दूध भरवण्यात येत आहे.

ओसीपीटल मेनिन्गोकोकल एन्सेफॅलोसिल म्हणजे काय?

ओसीपीटल मेनिन्गोकोकल एन्सेफॅलोसिल हा एक असा आजार आहे की, या आजारामध्ये संबंधित व्यक्तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला अतिरिक्त भाग वर येतो. त्याचा आजार हा एखाद्या पिशवी सारखा असतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला किंवा बालकाला दोन डोके असल्याचा भास होतो. मात्र हा काही असाध्य अजार नसून, शस्त्रक्रियेनंतर असा मनुष्य नॉर्मल जीवन जगू शकतो. तसेच या आजारापासून इतरही काही धोके उद्धभवत नाहीत.

संबंधित बातम्या

‘पंतप्रधान सांगत होते…’ मोदींनी योगींना त्या व्हायरल फोटोंमध्ये काय सांगत होते, राजनाथ सिंहांनी केला खुलासा

म्यानमार-भारत सीमा भागात भूकंपाचे धक्के; 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

चंद्रकांत पाटील अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल; निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय झाली चर्चा?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.