रंजन गोगोईंकडून मराठमोळ्या न्यायमूर्तींची सरन्यायाधीशपदासाठी शिफारस

सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice Ranjan Gogoi)यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (Justice Sharad Arvind Bobde)यांना पुढील सरन्यायाधीश बनवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:54 PM, 18 Oct 2019

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice Ranjan Gogoi) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (Justice Sharad Arvind Bobde) यांना पुढील सरन्यायाधीश बनवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत शुक्रवारी (18 ऑक्टोबर)त्यांनी सरकारला पत्रही पाठवलं आहे.

लॉ मिनिस्ट्रीला पत्र लिहून सरन्यायाधीश गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बोबडे यांचं नाव पुढे केलं आहे. देशाचे 46 वे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांनी 3 ऑक्टोबर 2018 ला सरन्यायाधीशपद सांभाळलं होतं.

कोण आहेत न्यायमूर्ती बोबडे?

न्यायमूर्ती बोबडे हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हाते. 24 एप्रिल 1956 ला न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा जन्म झाला. त्यांनी नागपूरच्या महाविद्यालयातून बीए एलएबीची पदवी घेतली. त्यानंतर ते मुंबई आणि नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठाचे कुलगुरुही झाले.

2013 मध्ये न्यायमूर्ती बोबडे हे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. ते 23 एप्रिल 2021 ला निवृत्त होणार आहेत.

बोबडे हे वकिलांच्या कुटुंबातून येतात. त्यांचे आजोबा हे प्रसिद्ध वकील आणि वडील अरविंद बोबडे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.