Cloud Burst : वीज पडते हे तर ऐकले असेलच, पण ढगफुटी काय असते हे माहिती आहे का तुम्हाला?
Cloud Burst : पावसाळ्यात वीज पडते. त्यात जीवितहानी होते. पण ढगफुटीविषयी तुम्हाला माहिती आहे का? कशी होते ढगफुटी, काय असते त्यामागील कारण? इतके पाणी घेऊन ढग जमा तरी कसे होतात? एका क्लिकवर जाणून घ्या.

देशातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने उत्तर भारतात थैमान घातले आहे. काही ठिकाणी नदी-नाले एकत्र झाले आहेत. गाव, शहरातील मुख्य रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. या रौद्र पाण्याच्या प्रवाहात जे येईल, ते वाहून जाते. काही भागात ढगफुटीचा कहर आपण गेल्या काही वर्षात अनुभवत आहोत. ढगफुटीमुळे मोठे नुकसान होते. गावच्या गाव उजाड होते. जमीन वाहून जाते.
ढगफुटी आणि ढग कोसळणे म्हणजे काय? सोसाट्याचा वारा सुटला. मुसळधार पाऊस पडायला लागला की, वीज कडतात. वीज पडते. आपण त्याच्याबद्दल अनेकदा ऐकतो. पण ढगफुटीबद्दल अजून लोकांना कळत नाही. ही ढगफुटी नेमकी कशी होते. त्यामागील कारण काय? इतके पाणी घेऊन ढग जमा तरी कसे होतात? जाणून घ्या.
ही ढगफुटी म्हणजे काय?
ढगफुटीला इंग्रजीत क्लाउड बर्स्ट असे म्हणतात. ढगफुटी म्हणजे क्षमतेपेक्षा अधिकचा पाऊस. एकदम धुवांधार पाऊस. अगदी कमी वेळेत पाऊस तुफान बरसतो. उंच भागात डोंगरी भागात असा पाऊस पडतो. तेव्हा असे वाटते जसे ढग जमिनीवर पडत आहेत. जमिनीवर अचानक मोठा पाऊस पडतो. गडगडाटासह हा पाऊस कोसळतो. अनेकदा मोठ्याला गारा यामध्ये असतात. कमी वेळेत अचानक मोठा पाऊस झाल्याने मग पूरसदृश्य पाणी वाहते.
कसे फाटते आभाळ?
तांत्रिकदृष्ट्या आभाळ फाटणे म्हणजे कमी वेळेत अधिकचा पाऊस होणे. पाऊस धुमाकूळ घालतो. मुसळधार पाऊस पडल्याने या घटनेला आभाळ फाटले, ढगफुटी असे म्हणतात. या घटनेमुळे त्या भागात मुसळधार पाऊस पडतो. कमी वेळेत इतका पाऊस पडतो की पूर येतो. अनेक वस्तू वाहून जातात. इतकेच काय घर आणि वाहनं सुद्धा त्यात वाहून जातात.
जेव्हा ढगांमध्ये जास्त आर्द्रता असते, तेव्हा ते खूप जड होतात. हवेचा दाब त्यांना सहन होत नाहीत. या ढगांमध्ये अतिरिक्त पाण्याचा साठा होतो. अशा परिस्थितीत मग कोसळधार सुरू होते. वेगाने पाणी पडते. त्याला ढगफुटी म्हणतात. आभाळ फाटले असे बोलीभाषेत म्हटल्या जाते. या काळात होत्याचे नव्हते होते, असे सामान्यपणे बोलले जाते.