Nana Patole: ‘आंधळे असल्याने त्यांना दिसत नाही की, राहुल गांधी…’, रामभद्राचार्य यांच्या वक्तव्यावर नाना पटोले हे काय बोलून गेले
Nana Patole on Swami Rambhadaracharya: काँग्रेस नेते नाना पटोले आणि स्वामी रामभद्राचार्य यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राहुल गांधी, प्रभू श्रीराम यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहे. काय आहे हा वाद? आता नाना पटोले यांच्या वक्तव्याची का होत आहे चर्चा?

Nana Patole on Swami Rambhadaracharya: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावरून एक वक्तव्य केले आहे. राहुल गांधी हे प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवरच चालत आहेत, असे पटोले म्हटले होते. त्यावरून वाद सुरू झाला आहे. नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी हे शोषित, पीडित आणि वंचित वर्गासाठी राजकारण करतात. पण आपण राहुल गांधी यांची तुलना प्रभू श्रीरामांशी केली नसल्याचे पटोले यांनी केली आहे. तर पटोले यांच्या वक्तव्यावर स्वामी रामभद्राचार्य यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. पटोले हे काँग्रेस आणि गांधी घरण्याची चाटुगिरी करत असल्याचा आरोप स्वामी रामभद्राचार्य यांनी केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळला.
राहुल गांधी हे कधीच प्रभू श्रीरामांना समजू शकत नाही
नाना पटोले यांनी राहुल गांधी हे प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर चालत असल्याचे वक्तव्य केले होते. तर ते शोषित,पीडित आणि वंचित घटकांसाठी काम करत असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यावर रामभद्राचार्य यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी हे कधीच प्रभू श्रीरामांना समजू शकत नाहीत. श्री राम आणि राहुल गांधी यांची कधीच तुलना होऊ शकत नाही. आता हे देवालाच ठाऊक की राहुल गांधी कसं काम करत आहेत, असा चिमटा ही रामभद्राचार्य यांनी काढला.
#WATCH | नागपुर, महाराष्ट्र: कांग्रेस नेता नाना पटोले ने जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य के बयान पर कहा, “…राहुल गांधी की लड़ाई शोषित, पीड़ित, वंचित वर्ग के लिए है, देश के लिए है… मैंने राहुल गांधी और भगवान श्री राम की तुलना नहीं की। मेरा मानना है कि राहुल गांधी भगवान राम के… pic.twitter.com/r4KZSzdhd2
— ANI_HindiNews (@AHindinews) January 1, 2026
नाना पटोलेंच्या टिप्पणीने वाद
स्वामी रामभद्राचार्य यांच्या या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. रामभद्राचार्य हे मोठे आणि आदरणीय व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मी व्यक्तिगत टिप्पणी करणार नाही. पण राहुल गांधी यांची लढाई ही नेहमी शेतकरी, गरीब आणि वंचित घटकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी सुरू आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले. काही लोक राहुल गांधी यांचे काम पाहू शकत नाही. कारण त्यांच्या म्हणण्यांनुसार, ते आंधळे आहेत. ते सत्य समजू शकत नाहीत, असे वक्तव्य पटोले यांनी केले. राहुल गांधी जे कार्य करत आहेत, ते देशाच्या हिताचे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही असे ही पटोले यांनी स्पष्ट केले.
पटोले यांनी रामायणातील उदाहरण देत, प्रभू श्रीरामालाही 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागल्याचे आणि अडचणींचा सामना करावा लागल्याचे म्हटले. आपण श्रीराम आणि राहुल गांधी यांची तुलना कधीच केली नाही. पण राहुल गांधी हे श्रीरामांच्या मार्गावर चालत असल्याचे म्हटले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
