AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result : बिहारमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; निष्पक्ष नसलेली निवडणूक…

Rahul Gandhi Comment in Bihar Election: काँग्रेसचा आणि महाआघाडीचा बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसला 10 पेक्षाही कमी जागा मिळाल्या आहे. यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bihar Election Result : बिहारमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; निष्पक्ष नसलेली निवडणूक...
Rahul Gandhi om bihar result
| Updated on: Nov 14, 2025 | 10:21 PM
Share

काँग्रेस आणि महाआघाडीचा बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. काँग्रेससह आरजेडी आणि इतर पक्षांनाही अपेक्षित यश मिळालेले नाही. महाआघाडीला 243 पैकी फक्त 35 जागांवर यश मिळाले आहे. तर काँग्रेसला 10 पेक्षाही कमी जागा मिळाल्या आहे. या दारूण पराभवावर लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले राहुल गांधी?

बिहार निवडणूकीतील पराभवावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘बिहारमधील लाखो मतदारांनी महाआघाडीवर विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. बिहारमधील हा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात आम्ही अपयशी ठरलो. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया अलायन्स या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आणखी तीव्र प्रयत्न करेल.’

मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या पराभवावर बोलताना म्हणाले की, ‘आम्ही बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरुद्ध आमचा लढा सुरू ठेवू. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणे जाणून घेऊ आणि त्यानंतर यावर भाष्य करू.’

निराश होण्याची गरज नाही – खरगे

पुढे बोलताना खरगे म्हणाले की, “महाआघाडीला पाठिंबा देणाऱ्या मतदारांचे आम्ही मनापासून आभार मानते. मी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की निराश होण्याची गरज नाही. तुम्ही आमचा अभिमान आहात. तुमचे कठोर परिश्रम ही आमची ताकद आहे. लोकांमध्ये राहून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवू.’

आत्मपरीक्षण करण्याची गरज – शशी थरूर

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ‘आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल. आत्मपरीक्षण करणे म्हणजे बसून विचार करणे असा नाही तर काय चूक झाली, काय रणनीतिक, मेसेजिंक किंवा संघटनात्मक चुका होत्या याचा अभ्यास करणे असा आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी कुठे चूक झाली याचे काही गंभीर विश्लेषण केले पाहिजे.’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.