कुत्रा चावल्याने होणारा आजार गायीला… रेबिज झालेल्या गायीचं जो दूध प्यायला तो दहशतीत, आतापर्यंत 16 जणांना…
धक्कादायक... कुत्रा चावल्याने होणारा आजार गायीला..., रेबिज झालेल्या गायीचं जो दूध प्यायला तो दहशतीत, गायीचं तर निधन झालं, तर आतापर्यंत 16 जणांना...

कुत्रा चावला की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो आणि उपचार घेतो. कुत्राने चावणं म्हणजे अत्यंत गंभीर बाब आहे. आता तर कुत्रा एका गायीला चावला आणि त्या गायीचं दूध गावकऱ्यांनी प्यायलं आहे. ज्यामुळे गावात दहशत माजली आहे. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातील कटका पोलीस स्टेशन हद्दीतील लावैया गावात गायीचं दूध प्यायल्याने 16 ग्रामस्थांना रेबीजविरोधी लस घ्यावी लागली. गायीला कुत्र्याने चावलं आणि ज्यामुळे गायीला रेबिजचं संसर्ग झाला. आता ज्या लोकांनी गायीचं दूध प्यायलं आहे, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे.
गाय अचानक आजारी पडल्यानंतर धक्कादायक प्रकरण समोर आलं. मनोज सिंग यांनी दिलेली माहितीनुसार, गायीला अचानक पाण्याची भीती वाटू लागली. गायीच्या तोंडातून लाळ टपकत होती आणि ती सतत स्वतःचं डोकं भींती आपटत होती. गायीची अशी अवस्था पाहून कुटुंबियांना देखील भीती वाटली.
गायीची प्रकृती खालावल्यानंतर ताबडतोब पशुवैद्यकांना बोलावण्यात आलं, त्यांनी गायीला रेबिज झाल्याची पुष्टी केली. रेबिजचं नाव ऐकताच संपूर्ण कुटुंब घाबरले. पण, गाय मरण पावली आणि खड्डा खोदून तिला पुरण्यात आले.
16 जणांना करण्यात आलं लसीकरण
गायीला रेबिज झाल्याची बातमी कळताच गावकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं. ज्या लोकांनी गायीचं दूध प्यायलं आहे आणि जो कोणी गायीच्या संपर्कात आला आहे, खबरदारी म्हणून त्या सर्वांना रेबिज विरोधी लस देण्यास सुरुवात झाली आहे. आतार्यंत 16 जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
गायीचे मालक मनोज सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या गायीला कुत्र्याने चावा घेतला होता. तज्ज्ञांच्या मते, जर गायीला कुत्रा, कोल्हा किंवा मुंगूस यासारख्या रेबिज संक्रमित प्राण्याने चावा घेतला तर त्यात रेबीज पसरू शकतो.
काय म्हणाले अधिकारी?
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कुमार सिंह म्हणाले, प्राण्यांमध्ये ‘सर्रा’ नावाचा आजार देखील असतो, ज्याची लक्षणं रेबिजसारखीच असतात. पण, गायीला कुत्रा चावला असल्याने रेबिज होण्याची शक्यता अधिक आहे. जर रेबिजची लक्षणं असलेल्या गायीचं दूध उकळून प्यायलं तर मानवांमध्ये रेबीज होण्याची शक्यता अजिबात नाही. खबरदारी म्हणून लसीकरण करावे असा सल्ला देखील डॉ. सिंह यांनी दिला.
