Cyclone Nivar Live Update : रात्र वैऱ्याची, घोंघावणाऱ्या भयावह वादळाचा कहर, एक लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं

निवार चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याआधीच तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली (Cyclone Nivar Live Update).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:48 AM, 26 Nov 2020

चेन्नई : तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर आज (25 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत ‘निवार’ चक्रीवादळ (Cyclone Nivar) धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हे चक्रीवादळ रात्री उशिरा ममल्लापुरम (Mamallapuram) आणि कराइकल (Karaikal) किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे वादळ जेव्हा किनारपट्टीवर धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग हा 120 ते 130 किमी प्रतीतास असा असणार आहे. त्यानंतर हा वेग 145 प्रतीतासांवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे (Cyclone Nivar Live Update). दरम्यान, वादळ किनाऱ्यावर धडकण्याआधीच चेन्नईत वेगवान वाऱ्याला सुरुवात झाली आहे. वाऱ्यासोबत पाऊसही पडत आहे.

काही भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

निवार चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याआधीच तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्राच्या लाटांची उंची वाढली आहे. जसजसं वादळ किनारपट्टीजवळ येईल तसतसं त्याचं रौद्र रुप आणखी प्रकर्षाने जाणवणार असल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक ट्रेन, फ्लाईट्स रद्द करण्यात आले आहेत (Cyclone Nivar Live Update).

चेन्नई आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन तामिळनाडूत बुधवारी (25 नोव्हेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पाण्याची पातळी वाढ होणार असल्याने चेंबरबक्कम तलावातून एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

[svt-event title=”तामिळनाडूत 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं” date=”26/11/2020,12:48AM” class=”svt-cd-green” ] तामिळनाडूतील 1 लाख नागरिकांना तर पद्दुचेरी येथून 1 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे.

[/svt-event]

[svt-event title=”मध्यरात्री 3 वाजता चक्रीवादळाची गती मंदावणार” date=”26/11/2020,12:43AM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळाचा वेग मध्यरात्री तीन नंतर कमी होईल, अशी माहिती चेन्नईच्या हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईत वेगवान वाऱ्याला सुरुवात” date=”25/11/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ] चेन्नईत चक्रीवादळ येण्याआधी वेगवान वाऱ्याला सुरुवात झाली आहे. वाऱ्यासोबत पाऊसही पडत आहे. लवकरच वादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई विमानतळावर 12 तासांसाठी सर्व उड्डाणे रद्द” date=”25/11/2020,6:58PM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई विमानतळावरील उड्डाण 12 तासांसाठी रद्द करण्यात आले आहे. संध्याकळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत चेन्नई विमानतळावरुन एका विमानाची उड्डाण होणार नाही.

[/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळामुळे UGC-NET परीक्षा स्थगित” date=”25/11/2020,6:47PM” class=”svt-cd-green” ] तामिळनाडू आणि पद्दुचेरीत उद्या (26 नोव्हेंबर) UGC-NET च्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये 26 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

[/svt-event]

[svt-event title=”पद्दुचेरी पासून अवघ्या 150 किमी अंतरावर ‘निवार'” date=”25/11/2020,4:51PM” class=”svt-cd-green” ] पद्दुचेरी पासून फक्त 150 किमीच्या अंतरावर निवार चक्रीवादळ आहे. आज संध्याकाळी ते किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तर तामिळनाडूच्या दिशेने पुढे वेगाने सरकरत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

[/svt-event]

[svt-event title=”किनारपट्टीवर जलद गतीचे वारे सुरु” date=”25/11/2020,4:45PM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळ धडकण्यापूर्वी किनाऱ्यावर जलद गतीचे वारे वाहू लागले आहेत.

[/svt-event]

[svt-event title=”‘निवार’चं रौद्र रुप किनारपट्टीवर धडकण्याआधी NDRF तयार, 37 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं” date=”25/11/2020,4:37PM” class=”svt-cd-green” ] निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे 25 पथकं दोन दिवसांपासून कामाला लागले आहेत. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन एनडीआरएफने तामिळनाडू पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात काही पथकं तैनात करण्यातआले आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एन एस प्रधान यांनी ‘एएनआय’ला प्रतक्रिया दिली आहे. “तामिळानाडूच्या किनारपट्टी जवळील भागांतून 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थली पोहोचवण्यात आलं आहे. तर पद्दुचेरी येथून 7 हजार नागरिकांना हलवण्यात आलं आहे. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन एकत्र मिळून काम करत आहेत. कमीत कमी नुकसान व्हावं, यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत”, असं प्रधान यांनी सांगितलं.

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला जाणाऱ्या ट्रेन रद्द ” date=”25/11/2020,3:18PM” class=”svt-cd-green” ] रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर रोजी दोन तर 26 नोव्हेबर रोजी तीन ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

 [/svt-event]

[svt-event title=”चेंबरबक्कम तलावातून पाण्याचा विसर्ग” date=”25/11/2020,3:24PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चेंबरबक्कम तलावातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय

[/svt-event]