ये अंधा कानून है! मृत व्यक्तीला ठोठावला रॅश ड्रायव्हिंगचा दंड

ओ. भास्करन असे शिक्षा ठोठवलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे तो कन्नूर येथे वास्तव्यास होता. 8 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. वाहन अपघातात भास्करचा मृत्यू झाला. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यालाच दंड ठोठावण्यात आला आहे.

ये अंधा कानून है! मृत व्यक्तीला ठोठावला रॅश ड्रायव्हिंगचा दंड
राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
वनिता कांबळे

|

Jul 01, 2022 | 11:02 PM

कन्नूर : वाहतूक नियमांचे(Traffic Rule) उल्लन केल्यास वाहूतूक पोलिस सबंधीत व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करतात. मात्र, मृत व्यक्तीला रॅश ड्रायव्हिंगचा(rash driving) दंड ठोठावण्यात आला आहे. केरळमध्ये(Keral) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मृत व्यक्तीला न्यायालयाने दंड ठोठावला आहे. न्यायालयाने दिलेल्या अजब निकालामुळे सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होत आहे.

ओ. भास्करन असे शिक्षा ठोठवलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे तो कन्नूर येथे वास्तव्यास होता. 8 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. वाहन अपघातात भास्करचा मृत्यू झाला. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यालाच दंड ठोठावण्यात आला आहे.

भास्कर याच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्याची कार थेट कालव्यात जाऊन पडली होती. या अपघातात भास्कर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या नंतर या अपघात प्रकरणी न्यायालयात खटला सुरु झाला.

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, भास्करनवर आयपीसीच्या कलम 279 अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर न्यायालयाने भास्करनला दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. दंड भरण्यासाठी न्यायालयाची नोटीस मिळाल्यावर भास्करनच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळला.

पोलिसांनी भास्करनचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली. पोलिसांना कोणताही तपास न करता प्रकरण बंद करायचे असल्याचा आरोप त्याच्या कुंटुंबियांनी केला आहे. भास्करन याची कार ज्या कालव्यात पडली त्याला कुंपन नव्हते. त्यामुळे त्याच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोही त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

बक्षीस जाहीर! पण 71 कोटी पाठवायचे कुणाच्या खात्यावर? लॉटरी कंपनी विनरचा शोध घेऊन घेऊन दमली पण…

अनेकांना लॉटरीचे तिकीट काढण्याची सवय असते. अनेक जण विजयी देखील होतात. ते स्वत: लॉटरी(lottery) कंपनीशी संपर्क साधून बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी धडपड करतात. मात्र, लंडमध्ये(UK) या विरुद्ध प्रकार घडला आहे. लॉटरी कंपनी स्वत: लॉटरीचे तिकीट जिंकणाऱ्या दावेदाराचा शोध घेत आहे. या लॉटरीच्या तिकीटाचे बक्षिस जाहीर झाले आहे. मात्र, बक्षिसाचे हे 71 कोटी पाठवायचे कुणाच्या खात्यावर? असा प्रश्न लॉटरी कंपनीला पडला आहे. त्यामुळे कंपनीकडून विनरचा शोध घेतला जात आहे. लॉटरीचे 71 कोटींचे बक्षीस जाहीर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें