अरेरे! नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी DRDO ने तयार केलेला अत्याधुनिक ड्रोन कोसळला

अपघाताच्यावेळी NTRO चे दोन-तीन अभियंते हा ड्रोन ऑपरेट करत होते. | DRDO drone

अरेरे! नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी DRDO ने तयार केलेला अत्याधुनिक ड्रोन कोसळला
इतक्या अत्याधुनिक ड्रोनचा असा अपघात झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 7:51 AM

जगदलपूर: दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ( DRDO) अत्याधुनिक ड्रोन रविवारी अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. दंडकारण्यात बस्तर आणि इतर राज्याच्या सीमावर्ती भागातील माओवाद्यांच्या (Naxal) हालचालीसाठी केंद्रीय गृहमंञालयाकडून हा ड्रोन मागवण्यात आला होता. (DRDO drone crashes in Chhattisgarh village)

अत्याधुनिक तंञज्ञानाने सुसज्ज मोठया आकाराचा ड्रोन छत्तीसगडच्या माओवादप्रभावीत जगदलपुरला पाठवण्यात आला. डीआरडीओच्या ताब्यात असलेल्या या ड्रोनची चाचणी सुरु होती. शहराभोवती एक फेरी मारून जगदलपुरच्या विमानतळावर लँडिंग करताना हा ड्रोन धावपट्टीवर न उतरता एका भिंतीवर जाऊन आदळला. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे. इतक्या अत्याधुनिक ड्रोनचा असा अपघात झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नक्षलविरोधी मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता

या भागात सुरक्षादलांकडून लवकरच नक्षलविरोधी मोहीम हाती घेण्यात येणार होती. या सगळ्यात ड्रोनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार होती. मात्र, आता हा ड्रोनच कोसळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डीआरडीओने हा ड्रोन विकसित केला होता. हा ड्रोन अत्याधुनिक बनावटीचा होता. त्यामुळे आकाशातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येणार होती. अपघाताच्यावेळी NTRO चे दोन-तीन अभियंते हा ड्रोन ऑपरेट करत होते. मात्र, कोणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

ड्रोनचे मोठे नुकसान

जगदलपूर विमानतळाच्या भिंतीवर आदळल्यामुळे या ड्रोनचे मोठे नुकसान झाले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की भिंतही तुटली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी ड्रोनचे अवशेष एका गाडीवर लादून पुन्हा विमानतळावर आणले. या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला

काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेली बस स्फोटकांनी उडवून दिली होती. या स्फोटात तीन जवान शहीद झाले होते. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. जवान एक मोहीम संपवून परतत असताना काडेनर आणि मांडोडाजवळ या परिसरात नक्षवाद्यांकडून हा स्फोट घडवण्यात आला.

संबंधित बातम्या:

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला, 3 DRG जवान शहीद, 8 गंभीर जखमी

(DRDO drone crashes in Chhattisgarh village)

Non Stop LIVE Update
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.