AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीचा बाजार उठला? आता ‘या’ नेत्याचा स्वबळाचा नारा

भाजप आणि मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली. त्यामुळे भारत विरुद्ध इंडिया आघाडी असा लोकसभा निवडणुकीत सामना होईल असं सांगितलं जात होतं. पण लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच इंडिया आघाडीत फूट पडली आहे. एक एक करून बहुतेक राजकीय पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडले असून त्यांनी वेगळी वाट धरली आहे.

लोकसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीचा बाजार उठला? आता ‘या’ नेत्याचा स्वबळाचा नारा
Farooq AbdullahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2024 | 4:37 PM
Share

नवी दिल्ली | 15 फेब्रुवारी 2024 : इंडिया आघाडीला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. आणखी एक पक्ष इंडिया आघाडीपासून दूर झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर उत्तर प्रदेशात जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आता नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. अब्दुल्ला यांनी तर एनडीएसोबत युती करण्याचे संकेतही दिले आहे. त्यामुळे इंडिआ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीची अवस्था आता बिछडे सब बारी बारी… अशी झाली आहे.

फारूख अब्दुल्ला यांनी श्रीनगर येथे बोलताना हे संकेत दिले आहे. जम्मू काश्मीरचे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकसाथ होतील असं मला वाटतं. सीट शेअरिंगबाबत बोलायचं झालं तर नॅशनल कॉन्फ्रन्स स्वबळावर निवडणूक लढणार आहे. यात काहीच शंका नाही, असं फारूख अब्दुल्ला यांनी सांगितलं. त्यामुळे अब्दुल्ला यांच्या विधानाने खळबळ उडाली असून इंडिया आघाडीतून अब्दुल्ला बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.

मला देश कायम आणि एकसंघ ठेवण्यासाठी जे करायचं ते मी करेन. आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. भविष्यात एनडीएसोबत जाण्याच्या शक्यतेला आम्ही नाकारू शकत नाही. इंडिया आघाडीत जागा वाटपावरून चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ममता बॅनर्जीचा एकला चालो रे…

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची आधीच घोषणा केलेली आहे. आधी टीएमसीने काँग्रेसला पश्चिम बंगालमधून दोन जागा घेण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यावरून काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी 42 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

पंजाबमध्ये आप स्वबळावर

आम आदमी पार्टीने पंजाबमधील 13 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपने आधी काँग्रेसला सहा जागांची ऑफर दिली होती. मात्र, त्यानंतर चर्चा झाली आणि चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही. दिल्लीत आपने काँग्रेसला अवघी एकच जागा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसने दिल्लीबाबतचा निर्णय लवकर घ्यावा, नाही तर आम्ही सातही जागांवर उमेदवार देऊ, असं आपने म्हटलं आहे.

जयंत चौधरींचा सवतासुभा

उत्तर प्रदेशातही इंडिया आघाडी संकटात आहे. जयंत पाटील यांची राष्ट्रीय लोकदल इंडिया आघाडीतून बाहेर पडली आहे. चौधरी यांनी एनडीएला साथ दिली आहे. तर समाजवादी पार्टीने काँग्रेसला फक्त 11 जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काँग्रेसने अजून काहीच भूमिका घेतलेली नाही.

शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.