कोरोनावरील लस बनवण्यासाठी 900 कोटींचं अतिरिक्त बजेट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे.

कोरोनावरील लस बनवण्यासाठी 900 कोटींचं अतिरिक्त बजेट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 4:01 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Press Conference) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची (Atmanirbhar Bharat 3.0) घोषणा केली.

आत्मनिर्भर भारत 3.0 पॅकेजमध्ये त्यांनी 12 वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. देशातील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अर्थमंत्री सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची (Atmanirbhar Bharat Rozgar Yojana) घोषणा केली आहे.

कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य मंत्रालय प्रयत्न करत आहे. देशातील विविध कंपन्या कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान अर्थमंत्री सीतारमण यांनी भारतात कोरोनावरील लस तयार करण्यासाठी अतिरिक्त बजेटची घोषणा केली आहे.

कोव्हिड सुरक्षा मिशन (Mission Covid Suraksha) अंतर्गत संशोधन आणि लस विकसित (research and vaccine development) करण्यासाठी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोव्हिड सुरक्षा मिशन अंतर्गत ही रक्कम डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीला देण्यात येणार आहे.

दरम्यान पुणे स्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने गुरुवारी घोषणा केली आहे की, कोरोनावरील लशीची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे.

कोरोनावरील लस कधी येणार?

कोरोना विषाणू संसर्गामुळं संपूर्ण जगात 10 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगातील सर्व नागरिक कोरोना लसीची वाट पाहात आहे. कोरोनावरील लसींचं संशोधन विविध देशांमध्ये सुरु आहे. मानवी चाचणी दरम्यान काहीवेळा लसींचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन कंपन्यांना त्याच्या कोरोना लसींच्या चाचण्या थांबवाव्या लागल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 154 कोरोना लसीवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. यापैकी 44 लसी मानवी चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी

आत्मनिर्भर भारत 3.0 पॅकेजची माहिती देताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, “भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, हळूहळू रुळावर येत आहे. जीएसटी परतावा दहा टक्क्यांनी वाढला आहे. बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के सुधार झाला आहे. मार्केटमध्ये रेकॉर्ड हाय, परदेशी गुंतवणूकही 13 टक्के अधिक आहे”.

“आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत एक देश एक रेशन 28 राज्यात लागू झालं. त्याचे आतापर्यंत 68.6 लाख लाभार्थी आहेत. दीड कोटी दरमहा व्यवहार होत आहेत. फेरीवाल्यांकडून 26 लाख 62 हजार अर्ज आतापर्यंत आले असून 13.78 लाख जणांना 1373 कोटींची कर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 183.14 लाख अर्ज आले. त्यापाकी 157.44 लाख शेतकरी पात्र ठरले. शेतकऱ्यांना 1.43 लाख कोटी दोन टप्प्यात याद्वारे देण्यात आले आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

Nirmala Sitharaman | ‘वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी : निर्मला सीतारमण

Corona Vaccine | कोरोना लस संशोधनात ‘हा’ देश सर्वात पुढे, सर्वसामान्यांना लस कधी मिळणार?

निवडणूक जिंकण्यासाठी कोरोना लस नाही, महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देऊ : नवाब मलिक

(Finance Minister Nirmala Sitharaman announces Rs 900 crores for Covid Vaccine research)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.