'देशी गायीच्या दुधात सोनं, परदेशी गाय माता नाही तर आंटी!'

परदेशी गायी आपल्या गोमाता नसतात, तर मावशा असतात, असं पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.

'देशी गायीच्या दुधात सोनं, परदेशी गाय माता नाही तर आंटी!'

कोलकाता : देशी गायींच्या दुधात अस्सल सोनं असतं, परदेशी गायी मात्र गो’माता’ नसून आपल्या मावशा (आंटी) असतात, असा जावईशोध पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Foreign cow aunty) यांनी लावला आहे.

‘देशी गायींचं स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं. त्यांच्या दुधात सोनं मिसळलेलं असतं. याच कारणामुळे त्यांचं दूध सोनेरी रंगाचं दिसतं. एक नाडी असते, जी सूर्यकिरणांच्या मदतीने सोनं तयार करण्यात मदत करते. म्हणून आपण देशी गायींचं जतन करायला पाहिजे. जर आपण देशी गायींचं दूध प्यायलं, तर आपण धष्टपुष्ट होऊ’ असं दिलीप घोष कोलकात्यात एका भाषणादरम्यान म्हणाले.

‘आपण ज्या परदेशी प्रजातींच्या गायी आणतो, त्या गायी नसतातच मुळी. त्या एक प्रकारचं जनावर असतात. परदेशी गायींचा
आवाजही देशी गायींप्रमाणे नसतो. त्या आपल्या गोमाता नसतात, तर मावशा असतात. आपण या आंटींची पूजा केली, तर ते
देशाच्या हिताचं नाही’ असंही घोष पुढे म्हणाले.

‘गाय आपली माऊली आहे. आपण गायीचं दूध पिऊन जिवंत राहतो. जर कोणी माझ्या आईसोबत गैरवर्तन केलं, तर मी तेच करणार जे योग्य आहे. भारतासारख्या पवित्र भूमीवर गायींची हत्या आणि गोमांस खाणं हा गुन्हाच आहे’ असंही दिलीप घोष म्हणतात.

चोरांनी लिपस्टिकने आरशावर लिहिलं ‘वहिनी खूप चांगली आहे’

‘काही बुद्धिजीवी लोक रस्त्यावर गोमांस खातात. त्यांनी कुत्र्याचं मांसही खावं, त्यांची प्रकृती ठणठणीत होईल’ असा सल्लाही दिलीप घोष यांनी दिला.

Foreign cow aunty

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *