राजदचे माजी खासदार शाहबुद्दीन यांचं कोरोनाने निधन; तेजस्वी यादव यांचं ट्विट

राजदचे माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचं कोरोनाने निधन झालं आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. (Former RJD MP Mohammad Shahabuddin dies of Covid)

राजदचे माजी खासदार शाहबुद्दीन यांचं कोरोनाने निधन; तेजस्वी यादव यांचं ट्विट
Mohammad Shahabuddin
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 2:56 PM

नवी दिल्ली: राजदचे माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचं कोरोनाने निधन झालं आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात शाहबुद्दीन यांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं होतं. मात्र, बिहार जेल प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावलं होतं. मात्र, तेजस्वी यादव यांनी ट्विट करून ही दु:खद बातमी दिली आहे. (Former RJD MP Mohammad Shahabuddin dies of Covid)

कोरोनाची लागण झाल्यानंतर माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांना मंगळवारी रात्री दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली हायकोर्टाने राज्य सरकार आणि तिहार जेल प्रशासनाला मोहम्मद शाहबुद्दीन यांना वैद्यकीय निगराणीखाली योग्य उपचार देण्याचे आदेश दिले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले.

तेजस्वी यांचं ट्विट

तेजस्वी यादव यांनी ट्विट करून शाहबुद्दीन यांच्या निधनाची माहिती दिली. माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचं कोरोनामुळे अकस्मिक निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने राजदची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे संकट सहन करण्याचे बळ देवो. या संकटाच्या प्रसंगात राजद शाहबुद्दीन यांच्या कुटुंबासोबत आहे, असं तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कुटुंबीय आणि राजदच्या हवाल्याने एएनआयचं वृत्त

दरम्यान, शाहबुद्दीन यांची प्रकृती गंभीर आहे, मात्र ते जिवंत आहे, असा दावा तिहार तुरुंग प्रशासनाने केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोष्टी अफवा असल्याचं तिहार तुरुंगाच्या डीजींचं म्हणणं गोचं. त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेने आधीचा ट्वीट डिलीट करत सुधारणा केली. राजद प्रवक्ते आणि शाहबुद्दीनच्या कुटुंबीयांनी तशी माहिती दिल्याचं सांगत एएनआयने दिलगिरी व्यक्त केली होती.

बिहारचा बाहुबली नेता

गँगस्टर ते खासदार असा राजकीय प्रवास असलेला मोहम्मद शाहबुद्दीन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. शाहबुद्दीन हे बिहारमधील सीवन मतदारसंघातून राजदच्या तिकीटावर लोकसभा खासदार होते. त्यांच्याविरोधीत तीन डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. 15 फेब्रुवारी 2018 रोजी सुप्रीम कोर्टाने त्याला बिहारच्या सीवन तुरुंगातून तिहार तुरुंगात नेण्याचे आदेश दिले होते.

वडिलांच्या निधनानंतरही पॅरोल नाही

गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचे वडील शेख मोहमद हसीबुल्लाह यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं होतं. त्यावेळी त्यांना पॅरोलवर बाहेर जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. (Former RJD MP Mohammad Shahabuddin dies of Covid)

संबंधित बातम्या:

शाहबुद्दीन साक्षात जिवंत, तिहार जेलचं स्पष्टीकरण, मृत्यूच्या बातमीनं दिल्ली ते बिहार सावळा गोंधळ

तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव तापाने फणफणला, अवघ्या तीन दिवसात कोरोनाने मृत्यू

(Former RJD MP Mohammad Shahabuddin dies of Covid)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.