Lockdown : लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम, गंगेचं पाणी पिण्यायोग्य स्वच्छ

गंगा नदीचं पाणी इतकं स्वच्छ झालं आहे की आता ते पाणी पिण्यायोग्य झालं आहे, असा दावा वैज्ञानिकांनी केला.

Lockdown : लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम, गंगेचं पाणी पिण्यायोग्य स्वच्छ
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 7:59 PM

नवी दिल्ली : चीनपासून (China Corona Virus) जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने (Ganga River Cleaner During Lockdown) भारतात थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 24 मार्चला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमुळे देशातील नागरिकांना घरातच राहावं लागत आहे, त्यामुळे अनेकांना याचा त्रासही होत आहे. लॉकडाऊनमुळे देशातली जवळपास सर्व कारखाने बंद झाले आहेत. मात्र, दुसरीकडे वाराणसी आणि हरिद्वार येथून वाहत जाणारी गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता वाढली आहे. गंगा नदीचं पाणी इतकं स्वच्छ झालं आहे की आता ते पाणी पिण्यायोग्य झालं आहे, असा दावा (Ganga River Cleaner During Lockdown) वैज्ञानिकांनी केला.

वृत्त संस्था एएनआयच्या रिपोर्टनुसार, हरिद्वार येथील घाट पूर्णपणे बंद असल्याने कुणीही गंगा नदीत आंघोळीला सध्या येत नाहीत. लोकांनी गंगेत आंघोळ न केल्याने आणि कचरा न फेकल्याने नदीचं पाणी स्वच्छ दिसू लागलं आहे. वैज्ञानिकांनुसार, आता गंगा नदीत मासेही दिसू लागले आहेत.

आयआयटी-बीएचयूचे (Ganga River Cleaner During Lockdown) प्राध्यापकांनी एएनआयला सांगितलं की, गंगा नदी प्रदुषित होण्यात उद्योग, जवळपासचे हॉटेल आणि इतर स्त्रोतांचा समावेश आहे. हे सर्व बंद झाल्याने पाण्याच्या गुणवत्तेत 40 ते 50 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत पाऊस झाल्याने गंगेचा पाण्याचा स्तरही खूप वाढला आहे.

गंगेसोबतच यमुनाचं पाणीही स्वच्छ

वैज्ञानिकांनुसार, गंगाच नाही, तर यमुना नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरुनही हा अंदाज लावता येतो की गंगा आणि यमुना नदी स्वच्छ झाली आहे. लॉकडाऊनसोबतच पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या स्तरामध्ये मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र शांतता आहे यामुळे या परिसरातून जे पक्षी गेले होते ते पुन्हा एकदा गंगाघाट परिसरात दिसू लागले (Ganga River Cleaner During Lockdown) आहेत.

संबंधित बातम्या :

पंजाबच्या डॉक्टरांचा चमत्कार, पोलिसाचा कापलेला हात साडेसात तासात जोडला

लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल

भारतात ‘कोरोना’ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, ‘कोरोना’ कसा पसरतोय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.