Goa Nightclub Fire : गोव्यात भडकली आग, लोकांना होरपळत सोडून लुथ्रा ब्रदर्स थायलंडला फरार, धक्कादायक माहिती समोर
Goa NightClub Fire News : गोव्याच्या अरपोरा येथील नाईट क्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरा लुथ्रा यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. 6 डिसेंबरच्या रात्री झालेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी थेट थायलडंला पळ काढला. एकीकडे क्लबला लागलेली आग धुमसत होती, नियंत्रणाबाहेर गेली, लोक होरपळत होते, तेव्हाच या दोन्ही भावांनी पळून जाण्याचं प्लानिंग केलं. त्यांच्याविरोधात इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. गोवा नाइट क्लबा लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला.

Goa NightClub Fire News : गोवा नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी लुथरा बंधूंवरील दबाव वाढत आहे. गोवा सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालय आता या विनंतीवर विचार करत आहे. गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीची (Goa NightClub Fire) जबाबदारी टाळण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या घटनेपासून स्वतःला दूर ठेवण्याचाही त्यांचा प्लान आहे. मात्र असे काही पुरावे समोर आले आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होतं की भारतातीयल कायद्यापासून वाचण्यासाठी ते दोघे भाऊन मुद्दाम देश सोडून पळून गेले. गोवा नाईट क्लब बर्च बाय रोमियो लेनचे मालक लूथर ब्रदर्स (सौरभ आणि गौरव) यांना आगीची माहिती मिळताच, त्यांनी थायलंडची तिकिटे बुक केली आणि ते लगेचच देश सोडून पळून गेले असे समोर आले आहे.
एकीकडे अग्निशमन विभागाचे पथक गोवा नाईट क्लबमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच, दुसरीकजे लुथ्रा ब्रदर्स मात्र देश सोडून थायलंडमधील फुकेत येथे पळून जाण्याचा विचार करत होते. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नाईट क्लबमध्ये आग लागल्याची 11:45 च्या सुमारास माहिती मिळाली. तर 1 वाजून 17 मिनिटांनी लुथ्रा बंधूंनी त्यांची तिकीटं बूक केली. म्हणजे त्या नाईट क्लबमध्ये आग लागल्यावर सुमारे 1 -दीड तासांतच त्यांनी थायलंडला पळून जाण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (6 डिसेंबर) रात्री उशिरा गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये आग लागली. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. यात चार पर्यटक होते आणि उर्वरित हे क्लबचे कर्मचारी होते.
कसे पळाले लुथ्रा बंधू ?
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईट क्लब आग प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथ्रा यांनी रविवारी पहाटे 1 वाजून 17 मिनिटांनी वाजता तिकिट बुक केली. उत्तर गोवा नाईट क्लबमध्ये आग लागल्यानंतर अवघ्या दीड तासाने त्यांनी हे बुकिंग केलं. गोवा क्लबकडून पहिला इमर्जन्सी कॉल हाँ रात्री 11.45 च्या सुमारास करण्यात आला. शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या दरम्यान उत्तर गोवा नाईटक्लबमध्ये 100 लोक जमले होते तेव्हाच ही आग लागली. या आगीप्रकरणी पोलिसांनी पाच कर्मचारी आणि लुथ्राचा व्यवसाय भागीदार अजय गुप्ता यांना अटक केली आहे, परंतु दोन्ही मालक अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, थायलंडला जाण्यासाठी मेक माय ट्रिप प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करण्यात आली होती. गोवा पोलिस आणि अग्निशमन सेवा आग विझवण्यात आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त असताना, आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते.
आगीबद्दल कळताच झाले फरार
या दुर्घटनेची तीव्रता कळण्यापूर्वीच दोन्ही आरोपी पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच त्यांना पळून जाण्यास मदत केल्याच आरोप पोलिसांवर आरोप आहे. पण पोलिसांनी हे आरोप फेटाळू लावले आहेत. गोवा पोलिस आणि सर्व सहाय्यक संस्था या रात्रभरापूसन ते सकाळी 6 वाजेपर्यंत घटनास्थळी होत्या, त्यांनी बचाव कार्य केले, आग विझवली आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. तर दोन्ही आरोप बंधी हे पहाटे 5.30 च्या फ्लाईटने देशाबाहेर गेले. म्हमजेच आगीबद्दल समजाताच आणि याचं गांभीर्य लक्षात येण्याआधीच त्यांनी पळ काढला.
