गोव्यात 'न्यूड पार्टी'चे पोस्टर व्हायरल, भारतासह परदेशी महिलांचाही समावेश

उत्तर गोव्यातील मोरजिम समुद्र किनाऱ्यावर ही न्यूड पार्टी होणार (Goa Nude Party) असल्याचे म्हटलं आहे. या पोस्टरनंतर गोवा पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे.

गोव्यात 'न्यूड पार्टी'चे पोस्टर व्हायरल, भारतासह परदेशी महिलांचाही समावेश

पणजी (गोवा) : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर गोव्यात न्यूड पार्टीचे (Goa Nude Party) आयोजन केल्याचे पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरमुळे गोव्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टरमध्ये उत्तर गोव्यातील मोरजिम समुद्र किनाऱ्यावर ही न्यूड पार्टी होणार (Goa Nude Party) असल्याचे म्हटलं आहे. या पोस्टरनंतर गोवा पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे. हे पोस्टर नक्की कुठून व्हायरल होत आहेत याच शोध पोलीस घेत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या पोस्टरवर गोव्यातील या न्यूड पार्टीत 15 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश असेल. तसेच यात तुम्हाला हवी तेवढी दारु आणि सेक्स करता येईल असेही या पोस्टरवर लिहीले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टरची गोवा पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

व्हायरल होणाऱ्या या पोस्टरवर ही पार्टी नेमकी कधी आणि कुठे होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या फोन नंबरवर फोन केल्यानंतर तो सातत्याने व्यस्त लागत असल्याचेही काही वेबसाईटने (Goa Nude Party) म्हटलं आहे.

या प्रकरणी गोव्याचे पोलीस अधिक्षक पंकज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकराचे कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. मात्र आम्ही या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. या पोस्टरवर वेळ आणि तारखेची माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर असलेल्या नंबरद्वारे आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत आहोत. असे ते म्हणाले.

तसेच राज्यात अशाप्रकारे कोणतीही न्यूड पार्टी आम्ही होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले. दरम्यान खरंच अशा प्रकारची पार्टी (Goa Nude Party) होणार आहे की फक्त एक अफवा पसरवली आहे याचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान गोवा महिला काँग्रेस अध्यक्षांनी या पोस्टरवरुन मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. प्रतिमा कोटिन्हो यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री मनोहर अजगांवकर यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. अशा प्रकारची कोणतीही न्यूड पार्टी होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *