जम्मू-काश्मीरमधील 50 हजाराहून अधिक बंद मंदिरं उघडणार

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा (Special Status of Jammu Kashmir) रद्द केल्यानंतर आणि जम्मू काश्मीरची 2 भागात विभागणी केल्यानंतर केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जम्मू-काश्मीरमधील 50 हजाराहून अधिक बंद मंदिरं उघडणार

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा (Special Status of Jammu Kashmir) रद्द केल्यानंतर आणि जम्मू काश्मीरची 2 भागात विभागणी केल्यानंतर केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत सरकार आता अनेक वर्षांपासून बंद असलेल्या 50 हजाराहून अधिक मंदिरं (Temples in Jammu Kashmir) खुले करणार आहेत.  केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांनी सोमवारी काश्मीर खोऱ्यातील बंद पडलेल्या मंदिरांचा सर्व्हे करत असल्याची माहिती दिली.

रेड्डी म्हणाले, ‘आम्ही काश्मीर खोऱ्यात बंद पडलेल्या मंदिरांचा सर्व्हे करण्यासाठी एका समितीचं गठन करत आहे. मागील काही वर्षात जवळपास 50 हजार मंदिरं बंद झाली होती. त्यातील काही मंदिरं नष्टही झाली आणि मूर्ती फुटल्या गेल्या. आम्ही अशा मंदिरांच्या सर्व्हेचा आदेश दिला आहे.”

जम्मू काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवाद फोफावल्यानंतर काश्मिरी पंडितांना मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. त्यामुळे संबंधित काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून पलायन करावं लागलं. दहशतवाद्यांनी खोऱ्यातील अनेक मंदिरांचंही नुकसान केलं. अनेक मंदिरं यामुळे बंद झाली. यात काही प्रसिद्ध मंदिरांचाही समावेश आहे. शोपियामध्ये भगवान विष्णुंचं मंदिर आहे. याचप्रकारे पहलगाममध्ये भगवान शिवाचं प्राचीन मंदिर बंद अवस्थेत आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *