तोफगोळे आले तरी नागरिक सुरक्षित कसे राहतात? पाकिस्तानला चकवण्यासाठी भारताने काय फिल्डिंग लावली?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचा करार केला असला तरी अद्याप परिस्थिती पूर्ण निवळलेली नाही. कोणत्याही क्षणी दोन्ही देशांत युद्ध भडकण्याची शक्यता अजूनही कमी झालेली नाही.

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचा करार केला असला तरी अद्याप परिस्थिती पूर्ण निवळलेली नाही. कोणत्याही क्षणी दोन्ही देशांत युद्ध भडकण्याची शक्यता अजूनही कमी झालेली नाही. याच कारणामुळे भारताचे प्रशासन आणि सैन्य पूर्ण ताकदीनीशी तयार आहे. आणीबाणीच्या स्थितीत सामान्य नागरिकांचे संरक्षण व्हावे आणि पाकिस्तानला चकवण्यासाठी सीमाभागात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सीमाभागात नागरिकांचे संरक्षण कसे होते?
जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग पाकिस्तानी सीमेला लागून आहे. त्यामुळे दोन्ही देशांत कोणताही वाद झाला की पाकिस्तानकडून अगोदर याच भागाला लक्ष्य केले जाते. हीच बाब लक्षात घेता सरकारने या भागात ठिकठिकाणी बंकर्स उभारलेले आहेत. युद्धजन्य स्थितीत किंवा शत्रूंनी हल्ला केल्यास या नागरिक या बंकरमध्ये जाऊन स्वत:चे संरक्षण करू शकतात.
पाच दिवसांपासून नागरिक बंकरमध्ये
सध्या भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी सांबा या भागात अनेक बंकर्स उभारण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीमुळे तेथील नागरिक याच बंकर्समध्ये थांबले आहेत. काही नागरिक तर गेल्या पाच दिवसांपासून याच बंकरमध्ये वास्तव्य करतायत. सीमेपलिकडे गोळीबार झाल्यावर आमच्या गावावर परिणाम होतो. त्यामुळे आम्ही या बंकरमध्ये राहतो, असे तेथील नागरिकांनी सांगितलेले आहे.
अनेक वर्षांपासून झाला नव्हता उपयोग
पाकिस्तानकडून या भागात हल्ले करण्यात आले. याच हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिक या बंकरमध्ये राहतात. घराच्या अगदी समोरच्या प्रांगणात ही बंकर्स निर्माण करण्यात आली आहेत. गावातील लोकसंख्येनुसार अशा बंकरची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बंकरचा उपयोग झालेला नव्हता. मात्र आता भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीत जम्मूच्या सीमेवर या बंकरचा वापर करण्यात येत आहे.
सध्या नेमकी स्थिती काय?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या शस्त्रसंधी झाली आहे. येत्या 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्यात चर्चा होणार आहे. सध्याचा तणाव आणि दहशतवाद या मुद्द्यांवर दोन्ही देशांत चर्चा होणार आहे. त्यामुळे 12 मे रोजी नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
