AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला पडलं महागात, किती नुकसान झालं? युद्धविरामानंतर पहिल्यांदाच आकडा समोर

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर आज युद्धविरामाची घोषणा झाली, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी यशस्वी ठरली, मात्र तोपर्यंत पाकिस्तानला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे. पहिल्यांदाच आकडेवारी समोर आली आहे.

भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला पडलं महागात, किती नुकसान झालं? युद्धविरामानंतर पहिल्यांदाच आकडा समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2025 | 8:26 PM
Share

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर आज युद्धविरामाची घोषणा झाली, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी यशस्वी ठरली, दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र युद्धविरामाची घोषणा करतानाच दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही असं यावेळी भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविरामाची घोषणा केली आहे. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं अभिनंदन देखील केलं आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलं आहे. याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसला आहे, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारतानं देखील प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर हल्ला केला, या ड्रोन हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान पाकिस्तानचं किती नुकसान झालं, याचा आकडा आता पहिल्यांदाच समोर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे सात एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, यामध्ये पाच एअरबेस आणि दोन रडारचा समावेश आहे.यामध्ये नूर खान एअरबेस, रावळपिंडी एअरबेस, रहमियार खान, मुस्तफाबाद, मुरीद, रफीकुई एअरबेस यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमानांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अनेक ड्रोनचे लाँचं पॅड देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. हजारो कोटी रुपयांच्या शस्त्रांचं नुकसान झालं आहे.

मोठा आर्थिक फटका

भारतासोबत पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलं आहे, आर्थिक आघाडीवर देखील पाकिस्तानला मोठा फटका फटका बसला आहे. भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर काही मोठे निर्णय घेतले होते, ज्यामध्ये पाकिस्तानसोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली, आयात -निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली, पाकिस्तानी विमानांना भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला, त्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे, पाकिस्तानचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तानला आता पुढील अनेक वर्ष लागू शकतात.

Follow Us
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....