इराणने इस्रायलवर हल्ला केला तर त्याचा भारतावर आणि तुमच्यावर काय होणार परिणाम?

इराण आणि इस्रायल यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. कारण येत्या २४ तासात कधीही इराणकडून इस्रायलवर हल्ल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. पण जर या दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढला तर याचा थेट परिणाम जगावर होणार आहे. भारताला देखील याचा मोठा फटका बसणार आहे.

इराणने इस्रायलवर हल्ला केला तर त्याचा भारतावर आणि तुमच्यावर काय होणार परिणाम?
israel iran
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 8:22 PM

Israel Iran Row : मध्यपूर्वेत तणाव वाढत चालला आहे. कारण इराणकडून कोणत्याही क्षणी इस्रायलवर हल्ल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. आधीच रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ जगाला बसली आहे. त्यात आता आणखी दोन देशात युद्ध सुरु झाले तर त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागणार आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम थेट तेलाच्या भावावर होणार आहे. तेलाचा पुरवठा खंडित झाल्यास त्याच्या किंमती गगणाला तर भिडतीलच पण त्याचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो. युद्ध होण्याआधीच त्याचे परिणाम दिसू लागदले आहेत.

इस्रायल-इराण वाद

दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर संशयित इस्रायली युद्धविमानाने केलेल्या हल्ल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे इराणकडून प्रत्युत्तर म्हणून कारवाईची भीती वाढली आहे. लिप्पो ऑइल असोसिएट्सचे अध्यक्ष अँड्र्यू लिप्पो यांनी मध्य पूर्वेतील घटनांशी संबंधित पुरवठा खंडित होण्याची भीती ठळक केली. यामुळे किमती वाढू शकतात.

इराणकडून इस्रायलवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने देखील वर्तवली आहे. दोन्ही देशात युद्ध झाले तर अमेरिका निश्चितच यामध्ये पडेल. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. इराणने सुएझ कालवा बंद करण्याची धमकी दिली आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढणार

जागतिक तेल बाजारावर संघर्ष सुरु होण्याच्या आधीच परिणाम दिसू लागले आहेत. तेलाचा पुरवठा खंडित झाला तर मग किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकतो. इस्रायल-हमास संघर्षाचा आधीच तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम झालाय. त्याची तीव्रता आणखी वाढू शकते. कच्च्या तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

भारतीय तेलाच्या किमतीवर परिणाम

भारत हा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भारताला आणि भारतीयांना बसू शकतो. यामुळे भारताचा तेल पुरवठा धोक्यात येऊ शकतो. मध्यपूर्वेतून मोठ्या प्रमाणात भारत तेल आयात करतो. रशिया-युक्रेन युद्धाचा देखील तेल पुरवठ्यावर परिणाम झाला होता. पण जगाने रशियाच्या तेलावर बंदी घातल्याने भारताने मात्र रशियाकडून खरेदी वाढवली होती.

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळे नजर ठेवून आहेत.

तेलाच्या किंमती वाढल्या की इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढतात. ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला की कंपन्या वस्तूंच्या किंमती वाढतात. त्यात मग भाजीपाल असो किंवा रोजच्या लागणाऱ्या वस्तू असो. सगळ्याच गोष्टींवर त्याचा मोठा परिणाम होतो.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.