AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प टॅरिफचा फुसका बार, भारताची गाडी सुसाट, IMF ने दिली मोठी Good News

Trump Tariff Fail: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र या कराचा कोणताही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

ट्रम्प टॅरिफचा फुसका बार, भारताची गाडी सुसाट, IMF ने दिली मोठी Good News
Trump Tariff Fail
| Updated on: Oct 14, 2025 | 11:28 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र या कराचा कोणताही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. IMF ने GDP 0.2 टक्क्यांनी वाढून तो 6.6 % असेल असं म्हटलं आहे. IMF च्या अंदाजामुळे अमेरिकेचा डाव फसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा GDP एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने म्हणजे 7.8 % वाढला. देशांतर्गत व्यापार मजबूत झाल्याने हा वेग जास्त राहिला. यामुळे अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला तरी भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था होती. याचाच अर्थ अमेरिकेच्या निर्णयाचा कोणताही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला नाही. उलट भारताचा विकासदर वाढला आहे.

IMF ने काय म्हटलं?

IMF ने आपल्या अहवालात म्हटले की. 2025-26 साठी भारताचा विकास दर पहिल्या तिमाहीत वेगाने वाढला. त्यामुळे अमेरिकेने लादलेल्या शुल्कामुळे होणारे भरून निघाले आहे. यंदाच्या वर्षी भारताचा विकासदर 6.4 वरून वाढवून 6.6 टक्के करण्यात आला आहे. मात्र पुढील आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर कमी होईल असं आयएमएफने म्हटलं आहे. 2026-27 साठी भारताचा विकासदर अंदाजे 0.2 टक्क्यांनी कमी होऊन तो 6.2% असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचात अर्थ भारताच्या विकासदरात घट होणार आहे.

जागतिक बँकेचाही सकारात्मक अंदाज

जागतिक बँकेने गेल्या आठवड्यात 2025-26 साठी भारताचा विकासदर 6.3% वरून 6.5% पर्यंत वाढवला होता. तसेत पुढील आर्थिक वर्षात विकासदर 6.5 % वरून 6.3% पर्यंत कमी केला होता. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही चालू वर्षांच्या अंदाजात वाढ केली आहे, ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. अमेरिकेने भारतावर कर लादून अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता जागतिक बँक आणि आयएमएफच्या अंदाजांमुळे अमेरिकेचा निर्णय फसल्याचे समोर आले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.