AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारताशी पंगा नको, होतील गंभीर परिणाम’, अमेरिकेच्या त्या रिपोर्टने पाकिस्तानची झोप उडाली

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. याचदरम्यान आता एक अहवाल समोर आला आहे.

'भारताशी पंगा नको, होतील गंभीर परिणाम', अमेरिकेच्या त्या रिपोर्टने पाकिस्तानची झोप उडाली
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: May 05, 2025 | 7:47 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे.  युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सर्व जगाचं लक्ष या दोन देशांकडे लागलं आहे. कारण हे दोन्ही देश न्यूक्लीयर पावर आहेत. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालचं तर यामध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि गाझा, रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धापेक्षाही हे नुकसान कितीतरी पटीनं अधिक असणार आहे.

त्यामुळे जगभरातील ज्या काही महत्त्वाच्या अर्थ संस्था आहेत, त्यांनी या युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात? याबाबतचे आपले रिपोर्ट सादर केले आहेत. जगातील सर्वोच्च रेटिंग एजन्सींपैकी एक असलेल्या ‘मूडीज’चा देखील असाच एक अहवाल समोर आला आहे. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर त्याचा भारताला कोणताही विशेष आर्थिक फटका बसणार नाही, मात्र पाकिस्तानचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असू शकतो. या युद्धामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव येईल असं मूडीजनं आपल्या अहवालामध्ये म्हटलं आहे.

‘मूडीज’नं सोमवारी यासंदर्भातील रिपोर्ट सादर केला आहे. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर त्याचा विशेष असा फटका भारतीय अर्थवव्यस्थेला बसेल असं कुठेही दिसून येत नाहीये, मात्र दुसरीकडे याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसू शकतो. पाकिस्तानचा आर्थिक वृद्धी दर आता हळूहळू सुधारत आहे. मात्र युद्ध झाल्यास त्याचा प्रचंड नकारात्मक परिणाम त्यांच्या आर्थिक वृद्धी दरावर होणार आहे. तसेच या युद्धामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव येईल असंही मूडीजने म्हटलं आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालं आहे. पाकिस्तानी सैन्याच्या पीओकेमधील हालचाली वाढल्या असून, त्यांच्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केलं जात आहे. तर दुसरीकडे भारताच्या गृहमंत्रालयाने देखील आता येत्या सात मे रोजी मॉक ड्रील घेण्याच्या आणि सायरन वाजवण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...